पान:बाबुर.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कंदाहार उर्जुन मोंगल ह्यांनी किंचित्काल वैर विसरून बाबुरास शैबानीखानाश तोंड देण्यासाठी मुद्दाम बोलाविलें. कंदाहारचे हे आमंत्रण बाबुरास मोठे मानाचे वाटले. कारण मुकीम आणि उर्घन हे दोघे त्याचे प्रतिस्पर्धी आणि त्यांनी आपणाजवळ क्षमेची याचना करावी यांत त्याला विशेष आनंद वाटत होता. तेव्हा पुन्हां काबुलाहून बाबुर या स्वारीसाठी निघाला आणि कंदाहारला आला. तो तेथे त्याला निराळाच प्रकार आढळला. तेथे आपले स्वागत आपला विव्नहर्ता सहाय्यक म्हणून उत्तम प्रकारे होईल अशा त्याची कल्पना होती, पण तसे कांहींच झाले नाही. त्याच्याशी ते कंदाहारी दोस्त बरोबरीच्या नात्याने वागू लागले आणि केव्हां केव्हां तर त्याचा अपमान होऊ लागला. पण असली वागणूक सहन करणाच्या मेल्या रक्ताचा बाबुर नव्हता. त्याने त्यांस जाब विचारला आणि लढाईचे आव्हान दिले. या वेळी बाबुराचें सैन्य चांगल्याच तयारीत होते. त्याचे वर्णन तो करतोः–

  • या वेळी माझे सैन्य दोन हजारांच्या सुमारांत होते. ज्या वेळीं शत्रूशीं सामना देण्याचा प्रसंग आला त्या वेळी ते हजार होते. त्यांना उत्तम तव्हेने शिकवून तयार केले होते. मी माझ्या लष्कराच्या दहादांच्या आणि पंधरापंधरांच्या तुकड्या केल्या होत्या. त्या प्रत्येक तुकडीवर एकेक अधिकारी नेमण्यांत आला होता. त्या तुकड्या मध्यबिंदूच्या डाव्या किंवा उजव्या ‘बाजूला कोठे उभ्या करावयाच्या, त्यांनी केव्हां आणि कशी चाल करावयाची

आणि युद्ध संपेपर्यंत कोणत्या धोरणाने वागावयाचे या सर्व गोष्टी माझ्या गणनायकांना उत्तम प्रकारे माहीत होत्या. कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ द्यावयाचा नाहीं वगैरे गोष्टी त्यांना उत्तम प्रकारे समजावून दिल्या होत्या. उजव्या आणि डाव्या बगलेच्या लोकांनी घोड्यांवरून शत्रूवर चाल करावयाची. ' कंदाहारचे युद्ध सुरू झाले तेव्हां बाबुराचे सैन्य छोटे असून सुद्धा त्याने मात केली. युद्ध सुरू होतांच शिस्तीच्या अभावीं शत्रूचे सैन्य गोंधळले पण