पान:बाबुर.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कंदाहार या अगांतुक राजकारणाचा निचरा होऊन बाबुर काबुलास जरा स्थिरावतो तोच त्याचे मन अस्थिर करणारी दुःखद वात आली. हिरातला गैबानीखानाची चाल विजयी होऊन सुलतान हुसेनचा वंशवृक्ष छाटला गेला आणि तैमूर-वंशाची पाळेमुळे खणली गेली. आता त्याचे नांव दुनियेतून नाहीसे झालें, गैबानीखानाची स्वारी म्हणजे त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक जगाची उलथापालथ करणारा तो एक झंजावात होता. त्याने तैमूरची नांदत सिंहासने गदगदां हलविली आणि ठोकरीने उधळून दिली. चंगीजखान व तैमूर या दोन रक्तांचा संबंध असणारी आणि मानाने राजा म्हणून मुजरे घेणारी अशी एकच बारकीशी शाखा शिल्लक होती, ती म्हणजे बाबुर. तेव्हां तैमूरबद्दल आदर बाळगणारे आणि त्याचे राज्य पुन्हां संस्थापिले जाऊन त्याचे वंशज त्याच्यावर नांदावेत असे ज्यांस वाटत होते, ते सर्व लोक बाबुराभोंवती जमा झाले. शैबानीखानाचे हे प्राणघातक सुदर्शन सर्वांच्याच मार्गे हात धुवून लागलें होते, आणि त्यात प्रत्येकास आपला कपाळमोक्ष दिसत होता. तेव्हां शत्रूनी सुद्धां कांहीं काल मित्रांची कातडी पांघरली होती. काबूलचा राजा उलंघन बैग वारल्यानंतर तेथील राज्य बळकावणारे कंदाहारचे मुाकिम बेग आणि