पान:बाबुर.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खडतर प्रवास सारखाच वाटतो. बाबुर त्या खड्ड्यांत बसला होता, बर्फ पडत होते. त्याच्या डोक्यावर चार इंचांचा थर सांठला. थंडीने अंगांतून वेट येऊ लागले. राजू म्हणजे मी म्हणत होती. तोंच “ गुहेत जागा मोप आहे, आंत या ' अशी आरोळी आली. त्याबरोबर ते सर्व लोक धडपडत जोरानें गुहेत शिरले. तेथे मात्र त्यांस निवारा सांपडला. ती रात्र मोठ्या आनंदाने पार पडली. या दिवसानंतर वादळाचा व बर्फवृष्टीचा जोर कमी झाला. पुढील प्रवास सुखाचा झाला, पण असल्या प्राणघातक संकटांशी तोंड देत देत बाबुराने काबूल गांठलें,