पान:बाबुर.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काबूलचे कारस्थान ! ! : २८ उशिरा निघून वेळेवर दाखल व्हावे, त्याप्रमाणे बाबुर या वेळी काबुलास आला. तो राजधानीच्या आसपास येतो तो त्यास एका कारस्थानाची कानगी लागली. आतां तो काबूलचा राजा नसून त्या ठिकाणी दुसन्या राजाची स्थापना झाली होती आणि त्याचे नांव खान मिझ असे होते. बाबुर हिरातला गेल्यावर त्याला तेथे कैद करण्यांत आले असून आतां तो माघारी येत नाही अशी गप्प उठली आणि पुढील कारस्थान उरकण्यांत आले. खान मिझ हा काबूलच्या सिंहासनास अत्यंत लायक वारस निवडण्यांत आला होता. समरकंदच्या सुलतान महंमदाचा हा एकुलता एक मुलगा. त्याचा बाप म्हणजे बाबुराचा सख्खा चुलता आणि आई म्हणजे बाबुराची एका बाजूने सख्खी चुलती आणि दुसन्या बाजूने सावत्र मावशी. अशा तहेर्ने खान मिझ म्हणजे बाबुराची जागा भरून काढण्यास अत्यंत लायक वारस होता. | बाबुर काबूलहून नाहीसा होतांच में राजकारण झपाट्याने शिजलें. खान मिझचे नातेवाईक काबुलांत होते. त्याची आजी म्हणजे बाबुराची सावत्र आजी, तिचे नांव शाह बेगम. ही जिवंत होती. पण बाबुराची आई व बाबुरासाठी जिवाचे रान करणारी त्याची आजी इसान दौलत या दोघीही या वेळी जिवंत नव्हत्या म्हणून हे राजकारण फोफावले व तडीस गेलं. नाहीं