पान:बाबुर.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८३ । बाबुर पर्वतशिखरावरून बर्फाच्या राशी बाजूला करीत करीत व त्याचे ओझे अंगावर घेत घेत एकेक पाऊल मोठ्या कष्टाने टाकीत टाकीत आपला मार्ग आक्रमीत होते. हा सर्व प्रवास अनुमानधपक्याने चालला होता. आठ दिवसांत दोनतीन मैलांचे अंतर कापले जात होते. आतां हे घोडदळ पायदळ झाले होते, आणि हातांत घोडे घेऊन प्रवास चालू होता. घोड्याचा आणि आपला जीव बचावून अंतर कापावयाचे होते. केव्हां गाड्यावर नाव तर केव्हां नावेवर गाडा असे हो रहाटगाडगे फिरत होते. आपण पुढे पावले टाकीत टाकीत जावे आणि नंतर घोड्यास खेचावे आणि केव्हां घसरगुंडी होते असे वाटतांच घोड्याच्या लगामास धरून आपला बचाव करावा. अक्षरशः रांगत रांगत, फरपटत फरपटत त्यांनी झिारन घाटाच्या पायथ्याशी कोहिलकोटी नांवाची एक गुहा गांठली. या ठिकाणी ते पहचण्याचा अवकाश की फार मोठ्या वादळास सुरुवात झाली. बर्फ असे कांहीं विलक्षण तडाखे मारू लागले की, ते सहन होईनात. प्राणांतिक वेदना होऊ लागल्या आणि सर्वच्या सर्व मरून जातात की काय असे वाटू लागले. गुहेच्या दाराशीं ते गेले, पण बर्फाने तिचे तोंड बुजले होते व एकेकाच्या संकेनेच प्रवेश करणे शक्य होते. गुहा दिसण्यांत लहान दिसत होती. तिचा तलास चालू झाला. सर्व सेना गुहेश आली आणि रात्र पडू लागली. रात्र काढण्यासाठी म्हणून जो तो आसरा करू लागला. बाबुराने कुदळीने बर्फ फोडण्यास सुरुवात केली. तडातडा त्याने गळ्यापर्यंत खोदले, पण त्यास जमीन लागली नाहीं. बर्फाचा थर फार जाड होता. मांडा ठोकून व्यवस्थितपणे रात्रभर बसतां येईल एवढा प्रशस्त खड्डा त्याने खोदून त्यांत तो बसला, तेव्हां गुहेत आसरा घ्या म्हणून त्यास विनंति करण्यांत आली पण ती त्याने मान्य केली नाही. तो आपल्या ठिकाणी स्तब्ध होता, सर्वांच्याबरोबर आपले काय होईल ते होईल, या विचाराने तो इंचभरही तेथून हलला नाहीं. मित्रांच्या सहवासांत मृत्यु हासुद्धां मेजवानी