पान:बाबुर.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबुर ma आपणसुद्धा या प्रांतांत स्वैरसंचार करावा आणि हा निबंध आपण तोडू शकलो तर फार चांगले. बालपणापासून मदिरेची आणि त्याची फारकतच होती, तेव्हां त्यापासून होणारा अनंद किंवा दुःख या दोहोंपैकी कशाचीच कल्पना त्याला नव्हती. कधी कधी त्याचे वडील त्यास मदिरापानासाठी आमंत्रण देत पण तें कांहीं तरी सबबी सांगून तो टाळीत असे. त्यांच्या मृत्यूनंतर मौलाना खवाज काझी यांनी मुद्दाम काळजीकांट्याने या बाबतीत त्याचे रक्षण केले होते. अभक्ष्य-भक्षण त्याला वज्य होते. ही झाली बालपणाची हकीगत. तरुणपणीं तारुण्याच्या उन्मादावस्थेत आपणसुद्धां दारू पिऊन मजा मारावी असे त्याला फार वाटे, पण त्या वेळी त्याची ही हृदयाची भूक जाणून ती पुरविणारा असा कोणीहि जिगर दोस्त त्याच्या मित्रमंडळांत नव्हता. मदिरापानाची इच्छा त्यास होत होती, पण अजून तरी तो त्यापासून अलिप्त होता. बाबुराचे आयुष्य या ठिकाणी मोठे आरामांत चालले होते. खुद्द हिरात शहरांत त्याने मुझफर मिझच्या सहवासांत वीस दिवसांचा पाहुणचार उपभोगिला. त्या वेळी हिरातच्या तोडीचे शहर जगांत दुसरे नव्हते आणि खरोखरीच त्याचे हे दिवस अत्यंत आनंदांत गेले, बाबुरची मेहुणी मासुमा या रूपसंपन्न युवतीचे बाबुरावर प्रेम होते, आणि त्या दोघांनी एकमेकांच्या सहवासांत या ठिकाणी स्वर्गीय आनंदाचा उपभोग घेत घेत हे दिवस काढले. हिरात शहरांतील त्याचे वास्तव्य एकंदरीनें सुखाचे झाले; पण आपण आलों कशासाठी आणि करतो काय हे विचार त्याच्या मनांत येतांच त्याची निराशा झाली. । शैबानीखानासारखा सामथ्र्यवान् शत्रु भोंवताली एकाद्या बहिरीससाण्याप्रमाणें घिरट्या घालीत असतां असली गहाळ आणि विलासी वागणूक म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूचे आव्हानच. तेथील ते शामियाने, गालीचे, गाद्यागिद्य, रुजामे आणि हमामखाने या सर्व गोष्टी शैबानीखानाचा पराभव करण्यास उपयोगी पडण्यासारख्या नव्हत्या. तेथे कडक शिस्त, शत्रूशी दोन हात करण्याची धमक व शौर्य कोठेच नव्हते. आणि त्याची जारीने तयारी करण्याचे कोणाच्याही मनांत नव्हते. बाबुराची निराशा झाली आणि तो काबूलला परतला.