पान:बाबुर.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७) अनोहर मासिक, १९४८ या ऐतिहासिक सत्यकथेत अद्भुतता सर्वत्र पसरली आहे. पुस्तकांतील निरनिराळ्या प्रकरणांना नांवेंही कादंबरीला शोभण्यासारखीच आहेत. * भेदनीतीचें जहर । * फितूर', भ्रमाचा भोपळा फुटला, आरोप, न्यायाचे थोतांड, तळिराम थंड झाला इत्यादि मथळे या दृष्टीने पहाण्यासारखे आहेत. करुणरस सर्व कथेत आरंभापासून शेवटपर्यंत चढत्या प्रमाणावर निर्माण होऊन तो इतक्या तीव्रतेला पोहोचतो की, वाचकाचे मन खिन्न होऊन शेवटीं 44 अरेरे ! काय हा आमचा अधःपात ! असे उद्गार मुखावाटे बाहेर पडतात. प्रस्तुत ग्रंथाची भाषा सहजसुंदर, ओघवती व निरनिराळ्या प्रसंगांना अनुरूप अशीच आहे. लेखक स्वतः विषयाशी तादात्म्य पावून, त्याच्या अंतःकरणांत तत्कालीन परिस्थिति व व्यक्ति याविषयी विविध भावना उदित होत राहतात व त्यामुळे भाषेत स्वाभाविकपणा उत्पन्न होतो. प्रा. गो. वि. तुळपुळे, पुणे. : कळस ऐतिहासिक कथासंग्रह। चित्रमय जगत्, फेब्रुवारी १९५१ मराठ्यांच्या, शैशव्यांच्या व मोगलांच्या इतिहासांतील कांही निवडक प्रसंगांवर आधारलेल्या या सात स्फूर्तिदायक कथा म्हणजे इतिहासकालांतील ज्वलंत चलचित्रंच होत. शिवशाहीचा अस्त व मराठ्यांच्या वीर कथा प्रसंवणाच्या तेजस्वी लेखणीतून या कथा उतरल्या आहेत त्यावरून त्या किती रसरशीत व धगधगत असतील हे सांगावयास नकोच. ऐतिहासिक पार्श्वभूमि व कमावलेली वीर-रसपोषक भाषा यामुळे प्रत्येक गोष्ट वाचनीय झाली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांत' या पुस्तकाचा अवश्य समावेश झाला पाहिजे.