पान:बाबुर.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्री. लेले यांच्या भाषेसंबंधाने मुद्दाम लिहिले पाहिजे, खास मराठी भाषेचे उत्कृष्ट नमुने या ग्रंथांत तुम्हांला ठिकठिकाणी आढळतलि. जे वाक्प्रचार मराठी भाषेची गोडी वाढवितात आणि ज्यामुळे ते ते लिखाण सरसकट लोकांना जवळचे वाटते, पण ते वाक्प्रचार बहुतेक लेखकांच्या लेखनांतून सांप्रत गेलेले आहेत. लेले यांच्या लिखाणांत मात्र ते जिकडे तिकडे सांपडतात, त्यामुळे जिवंत आणि ओळखीचे मराठी आपण वाचीत आहोत असे वाटते. लेले यांची भाषा फार चटकदार आहे. शिवशाहीच्या अस्तासंबंधीची या पुस्तकांत दिलेली हृदयद्रावक हकीगत एकदां तरी मुळांतुनच वाचावी अशी वाचकांस माझी विनंति आहे. त्रिकाळ, ता. १५ मार्च १९४८ प्रा. श्री. म. माटे, पुणे * शिवशाहीचा अस्त ' म्हणजे शिवप्रभूनी आयुष्य पणास लावून उभविलेल्या हिंदवी स्वातंत्र्याचा शेवट वा अखेर, अशा दुर्दैवी घटनांचे समालोचन हे सहृय वाचकांचे डोळ्यांत अश्रू उभे करणारे, हृदयास चटके देणारे आणि घडलेल्या अक्षम्य चुकांमुळे मनास पीळ पाडणारे झाले असल्यास नवल नाही. जेथे न्यायनिष्ठुर अशा प्रत्यक्ष इतिहासलेखकाची भग्नहृदय अशी अवस्था झाली तेथे वाचक शोकरसाने न्हाऊन निघेल यात काय आश्चर्य ! इतिहास म्हणजे एक रुक्ष विषय अशी अनेकांची खरी वा खोटी समजूत असते. परंतु प्रस्तुत ग्रंथांतील वेधक भाषाशैलीने मोहून जाणार नाही असा वाचक सांपडणे विरळाच ० ० ० त्यामुळे परिच्छेदामागून परिच्छेद वाचतांना अनेक गत घटनांनी गजबजलेल्या आणि अवाचित सांपडलेल्या एखाद्या ऐतिहासिक राजवाड्याची दालनेची दालने एकामागून एक आपण ओलांडत आहोत की काय असे वाचकास वाटते.