पान:बाबुर.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८) महाराष्ट्र, नागपूर श्री. लेले यांच्या ऐतिहासिक कथा परिणामकारक असून त्यांनी त्यांतुन ध्येयवादाचे केलेले दिग्दर्शन सुंदर आहे. पालकांनी चांगले संस्कार होण्यासाठी मुलांच्या हातांत जी पुस्तकें द्यावत त्यांत या पुस्तकाचा अवश्य समावेश केला पाहिजे. श्री. साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास, २७-५-५१ काळ, १-२-१९५१ या सर्वच कथा मराठ्यांच्या गुणावगुणांवर प्रकाश टाकणा-या, करुण व वीररसाने रसरसलेल्या व मराठ्यांच्या इतिहासासंबंधी विचार-प्रवर्तक झाल्या आहेत. अशी पुस्तकें शाळांतील अभ्यासक्रमांत अवश्य नेमावत. त्यांच्या वाचनाने मुलांना हसत खेळत इतिहासाचे ज्ञान होईल, इतिहासाची गोडी लागेल व ती स्वदेश व स्वदेशीय यांच्याविषयी अभिमान व प्रेम बाळगू लागतील. मयूरसिंहासन-कथासंग्रह। प्रभात, पुणे २०-५-५४ कै, हरिभाऊ आपटे यांच्यानंतर आजच्या पिढीत तेच महत्कार्य श्री. लेले हे आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या प्रभावी लेखणीने करीत आहेत. स्वातंत्र्य मिळाले असले तरी भूतकालीन इतिहासाचे धडे विसरून चालणार नाहींत. मूळचा ऐतिहासिक सत्याचा पाया कायम ठेवून त्यावर आकर्षक व मनोरंजक गोष्टीचा उठाव करावयाचा हे मोठे कौशल्याचे काम आहे. ते श्री, लेले यांना फार चांगले साधले आहे. के. वि. गोडबोले, पुणे