पान:बाबुर.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ बाबुर ^^^^^^^^^^ चढाई होतांच हुसेन मिझाच्या तळव्याची आग मस्तकाला गेली. त्याने शैवानीखानावर प्रचंड सामर्थ्याने चाल करून जाण्याचे ठरविले. यापुढे दुनियेंत एक शैबानीखान किंवा एक हुसेन मिझा यांपैकी कोणीतरी एकच राहू शकेल अशा आवेशाने त्याने जोरदार मांड मांडण्यास सुरुवात केली. शैबानीखानाशी सामना देण्यासाठी आपणास सर्वांनी साह्य करावे म्हणून हुसेन मिझने सर्वांना खलिते धाडले. त्याप्रमाणे त्याने बाबुरासही या स्वारीत भाग घेण्यासाठी बोलाविलें. बाबुरास हे आमंत्रण फारच अपूर्व वाटले; कारण तो ज्या गोष्टीची आज कित्येक दिवस वाट पाहात होता, ती नेमकी त्याच्यापुढे वाढून आली. त्यास अतिशय आनंद झाला. तो मोठ्या सैन्यासह या स्वारीत दाखल होण्यासाठी काबूलहून निघाला आणि आठशे मैलांचे अंतर कापून हिरातला आला, तो सुलतान हुसेन दिवंगत झाला होता, पण त्याचा मुलगा मोठ्या सैन्यानिशी मूर्ष अब नदीच्या कांठीं होता. शैबानीखानाचा आपण धुव्वा उडवू ; आपल्या आयुष्याला लागलेला अपयशाचा कलंक आपण धुवून काढू; आपल्या वंशाची खांडोळीं उडविणारास कंठस्नान घालू; आपल्या राज्याच्या ठिकन्या उडविणारास चांगला इंगा दाखवू ; मागे आपण त्याच्याशी एकटेच लढलों, आतां आपणास जोडीदार आहेत, या उमेदीच्या विचारांनी बाबुर त्या ठिकाणी आला; पण येथे येतांच त्याची निराशा झाली. येथे सर्व वातावरण निराळे दिसले, या हिरातव्य ! राज्यावर दोन राजे राज्य करीत होते. एक बादिअझ झमान हा सुलतान हुसेनचा थोरला मुलगा-हिरातचा युवराज म्हणजेच कायदेशीर वारस आणि दुसरा मुजफर हा त्याच्या आवडत्या रक्षेचा मुलगा. हे दोन राजपुत्र हिरातच्या राज्यावर जोड-राजे म्हणून राज्य करीत होते. तेव्हा त्यांच्या सैन्यांत व राज्यांत शिस्त काय दर्जाची असेल याची कल्पनाच केलेली बरी. तेथे त्वेषाने आणि पोटतिडकीने शैवानाखानावर तुटून पडण्याचे वातावरण कोठेच नव्हतं. ते सुलतान हुसेन मिझच्याबरोवर त्याच्या कबरीत गेले होते. तेथे विलास आणि ऐषआराम दिसत होता. रोज नव्या नव्या मजा होत होत्या आणि मेजवान्या झडत होत्या.