पान:बाबुर.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काबूल अन्न कसेबसे होते. त्याच्याजवळ दोनच तंबू होते. स्वतःचा तंबू त्याने आपल्या कुटुंबीयांस-मातोश्री वगैरेस दिला होता आणि दुस-या एका छोट्या तंबूत तो आपला गुजारा करीत असे. अशी ही स्वारी आतां आपला मोर्चा काबूलकडे वळविणार होती. यापुढे बाबुराच्या सैनिकांची संख्या दिवसानुदिवस वाढत होती. रोज नवे नवे लोक सैनिक म्हणून दाखल होत होते. काहींना तो आपल्या सैन्यांत दाखल करून घेत होता तर काहींना त्याच्याकडून मज्जाव होत होता. आता त्याच्या सैन्याचा मुख्य अधिकारी बकी बेग नांवाचा एक नवा गृहस्थ होता. त्याच्या मार्फत सर्व सूत्रे खेळत होती. बाबुराचा जुना दोस्त कंबरअली याला सुद्धा त्याने या नव्या मोहिमेंत घेतलें नाहीं. जहांगीर आणि नसीर या दोन्ही भावांना बाबुराने आपल्याबरोबर घेतले होते. इलस, उलुश, हजारा व मोंगल या जातींचा त्याच्या सैन्यांत विशेष भरणा होता. बाबुराचा लवाजमा व सैन्य म्हणजे एक पेंढार होते. त्याला शिस्त किंवा लष्करी वचक मुळीच नव्हता; पण लुटालूट करण्याच्या बाबतीत मात्र त्याचा हातखंडा होता. हे अपराध जेव्हां अत्यंत उग्र स्वरूप धारण करीत तेव्हां मग एकाद्यास मरेपर्यंत फटक्यांची शिक्षा होई। आणि मग वचक बसे, अशा त-हेने मजल दर मजल करीत करीत बाबुराचे हे सैन्य काबूलच्या आसपास आले. त्यानंतर काबूलवर स्वारी केव्हा व कशी करावयाची याचा विचार सुरू झाला. तेव्हां एक दिवस एका बैठकीत या स्वारीचा उहापोह करण्यांत आला. त्या वेळी बकी बेग हा मुख्य सूत्रधार-सरसेनापति होता. त्याचा सल्ला काबूलवर एकदम चाल करावी असा पडला आणि तसे ठरले. सैन्याची पूर्णपणे तयारी होतांच बाबुराच्या सैन्याने काबूलवर चालून घेतले. सैन्याच्या मध्यभागी बाबुर होता. दोन्ही बाजूला त्याचे दोन बंधू नर्सम आणि जहांगीर हे होते. काबूल सर करतांना फारशी लढत झालीच नाही. किरकोळ स्वरूपाच्या चकमकी झाल्या. काबूलचे राज्य बळकावणारा मुकीमबेग मोठ्या कष्टाने आपलं व आपल्या कुटुंबीयांचे जीव बचावून पळाला. बाबुराच्या मागोताल मीठाच कांटा नाहीसा झाला. बाबुराने काबूलमध्ये प्रवेश केला.