पान:बाबुर.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्थिरस्थावर व व्यवस्था | काबूलचा ताबा फारसा त्रास न होतां बाबुरास मिळाला. त्याच्या मनास आनंद झाला. आणि आनंद झाला नसता तरच आश्चर्य ! कारण सगळीकडे वाताहत झाली होती. स्वकीयांची डोकी परकीयांनी मारली होती. हाती सत्ता नव्हती को सैन्य नव्हते; मग संपत्तीची भाषा कशाला ? सगळीकडे निराशेच पिशाच्चें नाचत होती आणि अपयशाचा भेसूर वेताळ मनाच्या चिंधड्या एकसारखा उडवत होता. अशा स्थितीत काबूलचे राज्य म्हणजे कांठोकांठ भरलेला सुधा-कलशच त्यास वाटला. तेथील वनश्री अत्यंत रम्य होती, प्रदेश सुपीक होता. त्याचा एकंदर वसूल ४९५ ० ० ० रु. होता. - बाबुराची दृष्टि फार चिकित्सक होता. त्याने आपल्या नव्या प्रांताची पाहणी फार बारकाईने केली होती. तेथे कोणत्या प्रकारची झाडे आहेत व ती कोठे वाढतात, फुलझाडे आणि त्यांच्या तव्हा किती, पक्ष्यांच्या जाती कोणत्या, त्यांना वादळी हवेत हिंदुकुश पर्वतावरून कसे उडतां येत नाही, त्यांना कसे पकडतात, घोड्याचे उत्तम गवत कोणते व त्याची घनदाट राने कोठे आहेत, कोणत्या रानांतून गवत रेट आहे पण तेथे डांस मात्र अजिबात नाहीं अशी रानें कोठे आहेत वगैरे बारीकसारीक गोष्टींच्या नोंदी त्याने फार बारकाव्याने केल्या होत्या.