पान:बाबुर.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ बाबुर। wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww सत्ता प्रस्थापित झाली होती. शैवानीखानाच्या सामथ्यपुढे सर्वांनीं माना। टाकल्या होत्या. छाती काढून चालण्याची कोणाचीहि ताकद नव्हती. बाबुरास आशा करण्यासारखे आता फक्त एकच ठिकाण शिल्लक राहिले होते. ते म्हणजे काबूल. काबूलच्या सिंहासनावर त्याचा चुलता उलुगबेग हा राज्य करीत होता. तो इ. स. १५०१ मध्ये वारला. त्याच्या पश्चात् त्याचा मुलगा अबदररझाक हा राज्य करीत होता, पण त्याला पदच्युत करून ती गादी कंदाहारच्या एका बेग सरदाराने बळकावली. तेव्हां त्या माणसास हुसकावून देऊन ते सिंहासन आपण घ्यावे असे बाबुराच्या मनाने घेतले आणि तो काबूलची वाट चालू लागला. ह्या वेळी बाबुराचे वय एकवीस वर्षांचे होते. तो नुकताच चेहरेपट्टीसाठी वस्तरा वापरू लागला होता. एवढ्या छोट्या वयांत अनेक अनुभवांनी तावून-सुलाखून निघालेल्या बाबुराचें काबूलकडील प्रयाण म्हणजे त्याच्या आयुष्यांतील फारच मोठी क्रांति होती. तो तैमूरने मिळविलेल्या आणि आतां छिन्न-विच्छिन्न झालेल्या छोट्या राज्यांची हरळीची मुळी कुरतडत बसणार नव्हता, तर त्याने आतां त्या आकुंचित क्षेत्राकडे पाठ फिरविली. होती. त्याने आपला मोर्चा भव्य जगाच्या भव्य कार्यक्षेत्राकडे वळविला होता. त्याच्या कर्तबगारीला पुरे पडेल असे कार्यक्षेत्र त्याच्यापुढे वाढून ठेविले होते. प्राण पणाला लावून तीन वेळां समरकंदच्या राज्यावर राजा म्हणून राज्य करणारा हा भूपाल, आणि तीन वेळेला रानावनांतून उपाशीतापाशी भटकणारा हा भटक्या भाग्यवान् होणारा होता. समरकंदहून काबूल आणि काबूलहून दिल्ली अशी याचीं भाग्य-स्थळे एकापेक्षा एक सरस होती. तेथे त्याचे अलौकिक भाग्य लौकिकाच्या शिगेस पचणार होते. तेथे तो शेंकडों वर्षे टिकणा-या एका साम्राज्याचा सम्राट् होणार होता. पण सद्यस्थिति मात्र केविलवाणी होती. मोगल साम्राज्य संस्थापणारा हा सम्राट्। सध्या अगदी भिकारी होता. त्याच्याजवळ शे-दोनशे लोक होते. त्यांना अरबा बोडेच काय पण साधीं तद्येसुद्धा नव्हती. अंगभर वस्त्र आणि गोळाभर.