पान:बाबुर.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३ काबूल चंगीजखानाच्या आणि तैमूरच्या वंशजावर इ. स. १५०३ च्या मध्यांत भयंकर अनर्थ कोसळला. शैबानीखानाने त्यांना असा जबरदस्त तडाख दिला की हे दोन्ही वंशवृक्ष उन्मळून खाली पडले. शैवानखानाची धाड फारच मोठ्या प्रमाणाने आली आणि त्याने ह्या लोकांचा धुव्वा उडविला. तो ३ ० ० ० ० सैन्यासह समरकंदहून आला आणि विजेच्या लोळाप्रमाणे ताशकंदवर कोसळला. त्याचा ताबा घेतल्यानंतर त्याची चाल उरातिपावर आली आणि तेथून तो अक्षीवर चालून गेला. तेथे त्यास दोन खान भेटले. त्यांचा त्याने धुरळा केला. ह्या अपयशाने धास्तावून अहंमदखान मेला; पण महंमदखानाचे दैव अत्यंत खडतर होते, त्याचा व त्याच्या पांच मुलांचा खून शैबानीखानाच्या एका अधिका-याने केला. ह्याच दणक्यांत अहंमदखान तंबलही छाटला गेला. शैवानीखानाचे हें जबरदस्त सामथ्र्य पाहून बाबुर स्तिमितच झाला. या जबरदस्त माणसाशी यशस्वीपणे सामना देण्याचे सामर्थ्य आपण निर्माण केले पाहिजे ही खूणगांठ त्याने आपल्या मनाशी बांधली. पण प्रस्तुत बाबुराची स्थिति अत्यंत खालावली होती. त्याच्या कपाळीं आतां अरण्यवास लिहिला होता, उजळ माथ्याने फिरण्याची सोय नव्हती. फर्घाना, ताशकंद आणि बुखारा या ठिकाणी उझबेग लोकांची