पान:बाबुर.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबुर | शैबानीखान चालून येत असल्याचे वृत्त आले. तो समीप येतांच बाबुरच्या मामांनी त्याच्याशी तह केल्याची बातमी मागोमाग धडकली. नंतर अहंमद तंचल दोन-तीन हजार फौजेनिशी निघाला असल्याचे वृत्त दाखल झाले. आता मात्र बाबुरास फारच मोठा पेंच पडला. शैबानीखानाश मामांनी तह केला तेव्हां तीं द्वारे बंद झाली. आणि तंवले एवढ्या मोठ्या तयारीने बाहेर पडला तो शैवानीखानाशी गाठ घालण्यासाठीच. तेव्हां शैबानीखानाची आणि तंबलची गांठ पडेल तेव्हां पडेल, पण तो आतां आपली गठडी प्रथम वळेल व मग शैबानीखानाचे व त्याचे काय व्हावयाचे ते होईल. त्याच्या आधी हा फांस आपले नरडे आंवळणार खास, असे बाबुरास वाटले आणि ते खरेही होते. सुखकारक परिस्थितीच्या हिरवळींतून हा प्राणघातक प्रसंगाचा नाग सळसळतांच बाबुर घाबरला. त्याला सुटकेचा मार्ग कोठेच दिसेना. तेव्हां त्याने पोबारा केला आणि पुन्हां अरण्यवास पत्करला.