पान:बाबुर.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुटका आपलें त्यांच्याजवळचे वास्तव्य त्यांना असह्य झाले आहे आणि आपण येथून ह्या नाहीं त्या निमित्ताने हलावे असे त्यांच्या मनांत होते, हेही पण तो जाणून होता. पण बाबुरास त्याच्या मोगल मामांच्यापासून फोडण्यांत तंबलच्या भावाचे राजकारण मात्र पल्लेदार होते. फवना प्रांतावर स्वारी करण्यासाठी आलेल्या खानद्वयांत सेनानी कोणीच नव्हता. यशस्वी तहेर्ने हालचाली करून तंबलला तोंड देणारा किंबहुना त्यावर मात करणारा सेनानी काय तो बाबुरच होता. तेव्हा त्याला त्यांच्यापासून अलग केला की खानांचा खुर्दा करणे फार सोपे होते आणि बावुर पूर्णपणे काबूत आला की त्या कोवळ्या पोराला ठेचून टाकणे अशक्य नव्हते. राजकारणाची ही पावले बाबुराच्या लक्षात येत नव्हतीं असें नाहीं; पण त्याने आपल्या मनाशी निराळाच आराखडा आंखला होता. बायझिचे आमंत्रण आयते आले होते तेव्हां मामांच्यापासून मानाने दूर जातां येत होते. तसेच त्याचा त्याच्या स्वपराक्रमावर विश्वास होता, आणि आपण आपल्या चांगल्या वागणुकीने बायझिा पूर्णपणे आपलासा करू आणि तंबलची अर्धी शक्ति आत्मसात् करून अहंमद तंत्रलवर मात करूं ही बाबुरची विचासरणी अगदीच चुकीची होती असे नाही. तो तरुण होता. त्याच्या चित्तवृत्ति सरळ होत्या. तो पराक्रमी होता. तेव्हां प्रथम दर्शनी त्यास हे असे दिसले व त्याने तंबलच्या भावाच्या आमंत्रणाचा स्वीकार केला, आणि तो अक्षीला दाखल झाला. शेजारच्या एका मजबूत किल्लयांत तो राहू लागला. तेथे त्याच्या बापाने-उमरशेखने एक वाडा बांधला होता. त्या ठिकाणी बाबुरचे वास्तव्य होते. खास मालकीच्या घरांत भाड्याने राहण्याचा प्रसंग यावा तशांतलाच हा प्रकार. हे शल्य बाबुरास बोचत होतेच, पण एकंदर वातावरण ठीक होते. बायझिद्वी वागणूक साफ दिळाची दिसत होती. किल्ल्याचा ताबा त्याच्याकडेच होता. एकंदर वातावरण आपणास पाहिजे तसे आपण तयार करू असे बाबुरास वाटत होते. तोच एकाएकी रंग पालटला.