पान:बाबुर.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रभात, १३-७-१९४८ इतिहास वाचीत असतांना ज्यांच्या मनांत ममत्वाचा थोडातरी अंश असतो त्यांच्या मनांत विशेष प्रकारची कालवाकालव होते. शिवशाहीचा अस्तही गोष्ट महाराष्ट्रांतील लोकांच्या मनाला विशेष खेद उत्पन्न करणारी आहे. खुद्द इंग्रज सरकारने सातारच्या राज्यासंबंधी झालेला सर्व पत्रव्यवहार, आपण स्वतः केलेली लहानमोठी बरीवाईट कृत्यें आणि खुद्द प्रतापसिंहमहाराज आणि आप्पासाहेब महाराज यांचे खाजगी आणि सार्वजनिक जीवन व इंग्रज सरकार त्यांचे आलेले संबंध यासंबंधीचे सर्व दप्तर छापून शिल्लक ठेविले आहे. हे दप्तर वाचणे म्हणजे काही महिन्यांचे काम आहे, आणि त्याचा कागद भुरा काळसर झाल्याने अधू डोळ्याचे लोकांनी हे वाचन करण्यापूर्वी दहादां. विचार करावा. श्री. लेले यांनी ते वाचले असून श्री. बसू यांच्या ग्रंथाचेही अवलोकन केले आहे. बाळाजीपंत नातुचें तें लोभी, देशद्रोहाचे आणि स्वजनविद्वेषाचे वर्तन पाहून उद्वेग उत्पन्न झाल्यावांचून राहात नाहीं आणि खुद्द प्रतापसिंहमहाराजांच्या भावाने केवळ राज्यलोभाने आपल्या भावाच्या कीर्तीवर आणि गुणवैभवावर अंगार ठेवण्यास तयार व्हावे आणि बाळाजीपंत नातूसारख्या क्षुद्र बुद्धीच्या इसमाशी संगनमत करावे हे पाहिलें म्हणजे असे वाटते की त्या काळी महाराष्ट्रांतून कडव्या सद्गुणांची पिछेहाट होत होती आणि दुर्गुणांचा काळाबाजार सर्वत्र भरत होता. श्री. लेले यांनी ही पिछेहाट आणि हा बाजार याचे वर्णन निर्भयपणाने आणि कसलीही बाकी न ठेवत केले आहे.