पान:बाबुर.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुटका बाबुराच्या शरीराची जखम बरी झाली, पण त्याच्या मनाची जखम रोज चिघळत होती. रो ज कोणत्याना कोणत्या प्रसंगाने तिची खपली निघावी आणि बाबुरास प्राणांतिक यातना व्हाव्यात नी जगाचा निराळा अनुभव यावा. दुधाने तोंड पोळले म्हणून ताक हुंकून प्यावं, तो ताकानेच एखादे दिवशी असे तोंड भाजावें कीं जिभेला टरटरून फोड यावा, असे चालले होते. इतक्यांत बाबुरास तंबलच्या भावाचे बोलावणे आले. तो त्यास मिळाला म्हणजे अहंमद तंबलचा कांटा काढण्यास त्यास सोपे जाणार होते. भावाचा गळा कापण्यासाठी त्यास बाबुराची मदत पाहिजे होती. हे आमंत्रण येतांच बाबु राच्या मामांना मोठे समाधान वाटलें. कारण बाबुराचें-आपल्या भाच्याचे ओझे त्यांना जड वाटत होते. तेव्हां ते अशा त-हेने परस्पर नाहीसे झाल्यास त्यांचे आयते काम होणार होते. त्यांनी त्यास तंबलच्या भावास जाऊन मिळण्याचा सल्ला दिला. तंबलच्या भावाशी–बयााझ स्नेहसंबंध घनदाट वाढवून त्याच्या मदतीने तंबलचा कांटा काढावा आणि तंबल दुनियेतून नाहींसा झाला की त्याच्या भावाचा-बयाझिचा निकाल लावावा, हे त्याच्या मामांचे ओठांतून बाहेर पडणारे विचार बाबुरास कळत नव्हते असे नाहीं; पण मामांच्या पोटांत काय मळमळत होते हेही तो जाणून होता.