पान:बाबुर.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कुचंबणा wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww अहंमदखानाचा बडिवार आपणच वाढविला पाहिजे, आणि त्यासाठी त्याचे राज्य भरघोंस असलेच पाहिजे. आतां आपण समरकंद जिंकणारच आहोंत. तसे होतांच ते जसेच्या तसे बाबुराच्या स्वाधीन करू. मामांच्या या दरबारी वागणुकीचा आणि थापांचा बाबुरास अत्यंत वीट आला होता. या स्वारीत फारसे यश आले नव्हते म्हणून त्यांच्या भाषा इतपत तरी होत्या. जर त्यांच्या हातास यश येते तर कसचा बाबुर आणि कसचे काय अशीच त्यांची उडवाउडवीची वागणूक झाली असती हें बाबुर जाणून होता. पण विचारा प्रसंगांत सांपडला होता. सुसरीबाई, तुझी पाठ मऊ म्हणून दिवस काढणे त्याला भाग होते. महंमदखानाच्या थापा ऐकल्यानंतर बाबुर अहंमदखानाकडे गेला. तेथे त्यास जखमेमुळे लंगडत येतांना त्याने पाहिले. तेव्हां तो धांवतच त्याच्याजवळ गेला व त्याने त्यास मोठ्या आस्थेने आपल्या तंबूत आणिलें, त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि जखमेवर औषधोपचार करण्यासाठी म्हणून ताबडतोब हकीमास बोलाविणे पाठविलें. धाकट्या मामाच्या या वागणुकीने बाबुरास बरे वाटले. अहंमदखानाच्या हकीमानें बाबुराच्या जखमेस औषधोपचार उत्तम प्रकारे केल्याने त्यास बरे वाटले.