पान:बाबुर.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कुचंबणा गरजू माणसाच्या भोंवतीं वावरणारे जग मोठे धोरणी आणि धूर्त असते. त्या माणसाच्या नाजूक स्थितीचा फायदा घेऊन त्याला पूर्णपणे कसें नागवावें हे ते जाणते. बाबुराचे मामा उभयता खान आत असेच वागत होते. आपला भाचा पूर्णपणे नाडला आहे, तेव्हां त्याला राबवून लोण्याचा मोठा गोळा मोठ्या शिताफीनें लम्पास करणे हे एकच काम तूर्त त्यांनी चालविले होते. प्रस्तुतच्या स्वारींत कोणालाच म्हणण्यासारखें यश आले नव्हते. जो तो अब राखून होता. बाबुरने मात्र कांहीं प्रांत जिकले होते, वास्तविक ते पूर्वी त्याचेच होते आणि आतां त्याने स्वसामर्थ्याने पुन्हा जिंकल्याकारणाने ते त्याच्या ताब्यात देणे हे त्याच्या मामांचे काम होते. पण असे झाले असते म्हणजे मग मनुष्य कसला आणि त्याचा तो स्वार्थ तरी कसला ! बाबुराच्या मामाने-महंमदखानाने आतां मोठी गंमत चालविली. बाबुराने या स्वारीत पुन्हा जिंकलेले हे प्रांत महमदखानाने आपल्या भावाच्याअहंमदखानाच्या ताब्यात दिले आणि त्यावर अशी मल्लीनाथी केली की, अहंमदखानाच्या ताब्यात हे प्रांत असणे अत्यंत जरूर आहे आणि असे करण्यांत भविष्यकाली बाबुराचेच कल्याण आहे. आपणा सर्वांचा शत्रु शैवानिखान याच्यावर चांगला वचक बसावा अशी इच्छा असेल तर