पान:बाबुर.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जखमी वाघ बाबुर फारच सावधगिरीने निजत असे. कंबरअल्लीची आरोळी ऐकतांच बाबुर ताडकन् उठला. त्याने आपली पंचहत्यारे घेतली व घोड्यावर स्वार होऊन तो निघाला. त्याच्याबरोबर दहा-बारा लोक होते. तो आघाडीवर होता. ते मैल अर्धा मैल अंतर कापतात न कापतात तोंच शत्रु दिसू लागला. हां हां म्हणतां चकमकीस सुरुवात झाली. ह्या बारीक चकमकींना चुकवून बाबुर पुढे निघाला. तो तंबल आपल्या लष्कराच्या समोर कांहीं सैनिकांश बोलतांना बाबुरास दिसला. त्याबरोबर बाबुराचा त्वेष अनावर झाला आणि त्याने एक बाण तंबलवर सोडला. तो तंबलचे शिरस्त्राणास चाटून पुढे गेला. तंबलने लगेच आपला घोडा वळविला आणि बेधडक बाबुरवर चाल केली. तंबलने नखशिखान्त लोखंडी चिलखत घातले होते; बाबुराने फक्त चिलखतीं कोपरी घातली होती. त्याच्या मांड्या सुरक्षित नव्हत्या. दोघांची बाणांची, नंतर खड्गांची चांगलीच झकापक झाली. बाबुराच्या मांडीस जखम झाली आणि ही खणखणी संपली.