पान:बाबुर.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जखमी वाघ बाबुराच्या दोन्ही मामांनी त्याच्या हाताखाली एक स्वतंत्र तुकडी देऊन त्याची रवानगी या स्वारीवर केली होती. उश आणि उशकंद ही दोन शहरे बाबुराने हातोहात घेतली. तेथील लोकांना हा उमदा राजा आलेला पाहतांच आनंद झाला. मार्धिनान हैं शहरही त्याचेच होते. तेथील लोक त्याच्याभोवती जमा झाले. दोन खान आणि बाबुर आपल्यावर निघाले आहेत आणि बाबुर इतका समीप आला आहे ह्या गोष्टी अहंमद तंबलला कळतांच त्याच्या हालचाली सुरू झाल्या. तंबल अंदिजानला होता आणि त्या ठिकाणी त्याच्याशी गांठ घालण्याचा बाबुराचा बेत होता. त्या शहराच्या आसपास त्याने आपला तळ टाकिला व योग्य समयाची. वाट पाहात तो त्या ठिकाणी दबा धरून बसला होता. अंदिजानचे अमीर, उमराव, मौलाना, काजी, उदीम -व्यापारी वगैरे माणसे फोडण्याचे काम चालू होते. एकंदर वातावरण बाबुरला अनुकूल होते, आणि अहंमद तंवलला आपण उखाड खास देत असे त्यास वाटू लागले. तोच एक दिवस उजाडतांच शत्रु समीप आल्याची आरोळा कंबरअल्लीने ठोकली. त्याबरोबर शत्रूस तोंड देण्यासाठी बाबुराचे लष्कर तयार होऊ लागले. त्या वेळच्या धामधुमीच्या काळांत केव्हां काय प्रसंग येईल याचा नेम नसल्याकारणाने