पान:बाबुर.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वनवास आठवण होतांच सूडाच्या भावनेने त्याच्या सर्व शरीरभर चेव भणाणे, वाटेल ते साहस करून त्याचा खुद करावा असे त्यास वाटे. अधूनमधून त्यास संतप्त करून सोडणाच्या अशा विचारांची मालिका त्याच्या डोक्यांत चाले. । एका हिवाळ्यांत सर या गांवाच्या आसपास लूटमार करण्यासाठी तंबल आल्याची बातमी बाबुरास लागली. त्याबरोबर त्याला गाठून त्याची खांडोळा उडवावीत या हेतूने बाबुर त्याच्यावर चाल करून गेला; पण त्या ठिकाणी तो जातो तो तंबल तेथून नाहीसा झाला होता. त्यामुळे बाबुराची निराशा झाली. बाबुराने तेथील शेतक-यांच्या सहवासांत पांच-सहा महिन्यांचा काल काढिला; पण त्याला त्या ठिकाणी चैन पडेना, तेव्हा त्याने आपल्या मामाला भेटण्याचे ठरविले आणि ता. १६ जून इ. स. १५०२ ला तो ताशकंदला मिझ महंमदखानाकडे निघाला. उभयतांच्या भेटी झाल्या, पण एकंदर वातावरण फारसे उत्साहकारक नव्हते. अहंमद तंबलचा बंदोबस्त करण्याचे मात्र त्याच्या मनांत होते, कारण तो त्याच्या राज्यांत वारंवार लूटमार करी व त्रास देई, तंबलच्या स्वारीत बाबुराने भाग घ्यावा असे त्यास वाटत होते. त्याच्या मनाचा हा ठाव घेऊन बाबुर तेथून यलदूजला त्याचा धाकटा मामा अहंमदखान होता तिकडे जाण्यासाठी निघाला; पण बाबुरास तिकडे जाण्याचे कारणच पडले नाही. त्याचा मामा अहंमदखान आपल्या भावाला भेटण्यासाठी म्हणून निघाला होता. उभयता खानांची भेट झाली. दोघांचे सख्य झालें व तंबलचा कांटा काढण्याचा बेत निश्चित झाला आणि त्या स्वारीवर ते निघाले.