पान:बाबुर.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ बाबुर मौज वाटे. ती आख्याने ऐकत असतां आपण हिंदुस्थानांत जावे व तेथे साम्राज्य स्थापावे असे बाबुरास वाटे. त्या राज्याची पुसट चित्रं त्याच्या दृष्टिसमोर उभी रहात. पुढे ह्याच विचारांची परिणति दुःखांत होई. आपणास येथील वडिलार्जित राज्ये सांभाळतां आली नाहीत तर आतां कसचे राज्य नी कसचें साम्राराज्य ! काय घेऊन बसला आहेस ? वेडा कोठला ! ! असे विचार मनांत येऊन त्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहात. पण त्यावेळी त्यास माहीत नव्हते की, तोच पुढे हिंदुस्थानांत मोगल साम्राज्य स्थापन करणार होता. आता मात्र त्याच्या बैठकीला सिंहासन नव्हते, साधे पटकुर सुद्धां नव्हते बोडक्या खडकावर तो बसला होता व त्याचे कंगोरे त्यास रुतत होते, सध्या त्याची मनस्थिति एखाद्या सशाप्रमाणे भेकड झाली होती, जरा । कांहीं खुट्ट झाले की तो गांगरून कान टवकारून पाही. या वेळी त्याची आई, आजी वगैरे मंडळी लपत छपत त्याच्याकडे येत होती, पण त्यांना पाहून हा घाबरला, माणसांत एकदां का न्यूनंगड निर्माण झाला की त्याची दैना उडते. पंजाच्या एकाच फटकाच्याने मस्त गजराजाचे गंडस्थळ फोडू पाहणारा वनराज गोगलगाय बनतो. पड्या माणसाला कोणीहि उपदेशाचे सवंग अमृत पाजता, तसे त्याचे झाले होते. बाबुराच्या एका मित्राने त्यास असा उपदेश केला कॉ, त्याचे यापुढील आयुष्य वैभवांत नांदणा-या त्याच्या भाऊबंदांच्या कृपेवर अवलंबून आहे. तेव्हां त्यांस नजर-नजराणे धाडणे व त्यांची कृपा संपादन करणे हेच त्याचे काम आहे. त्याच्या या बडबडीचा बाबुराच्या मनावर परिणाम झाला. खरोखरीच त्या मुर्दाड माणसाच्या सांगण्याप्रमाणे फघांना प्रान्ताचे राज्य बळकावून बसणाच्या जहांगिराला-आपल्या भावाला एक उत्तमपैकी फरीचे शिरस्त्राण त्याने पाठविले. त्याबरोबरच त्याचा हाडवैर पण जहांगीरच्या राज्याचा मुख्य सूत्रधार अहंमद तंबल यालाहि समरकंदची प्रख्यातपैकी वजनदार तलवार त्याने भेट धाडिली. हा नजराणा धाडतांना बाबुराचे अंत:करण कढत होते, अश्रूचा पूर वाहात होता. अहंमद तंबलची