पान:बाबुर.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वनवास दुःखद विचारांचे विंचू एकसारखे फणकारे मारीत असतां दिवस कंठण्याचा प्रसंग बाबुरावर पुन्हा एकदां आला. उरातिपा शहराच्या असमंतात् असणाच्या कडेपठारावर हे दिवस काढण्याचे त्याने ठरविले. तेथील शेतकरी आणि धनगर यांच्याशी गप्पा मारण्यांत आणि त्यांच्या जीविताशी समरस होण्यांत बाबुरास निरतिशय आनंद होत असे. त्यांची गुरेढोरें, मेंढरें, कोंकरें हिरव्याचार हिरवळीवर चरतांना पाहून बाबुराचें मन प्रसन्न होई. ती गोजिरवाण को करें सूर्यनारायणाच्या सोनेरी किरणांच्या मंद प्रकाशांत मखमलीप्रमाणे दिसणाच्या त्या भूमीवर बागडतांना पाहून बाबुर एखाद्या फुलपांखराप्रमाणे त्यांच्या मागोमाग उड्या मारी. आपण राजराजेश्वर आहत हैं तो विसरे आणि त्यांच्यामागे अनवाणी जाई. त्याचा मुक्काम एका मातबर शेतक-याच्या सन्निध होता. त्याची म्हातारी एकशे अकरा वर्षांची होती. ह्या झुनाट वेलीचा विस्तार फार मोठा होता. तिचीं नातवंडेपणतवंडे मिळून शहाण्णव लोक होते. ते सर्व आसपासच्या प्रदेशांत पसरले होते. तिच्या एका जवळच्या नातेवाइकानें तैमूरबरोबर हिंदुस्थानच्या स्वान्यांत नोकरी केली होती. ही म्हातारी तैमूरच्या शौर्याच्या गोष्टी सांगून बाबुराचे मनोरंजन करीत असे. त्या वीर-कथा ऐकतांना बाबुरास मोठी होती. या जुनाट वेले