पान:बाबुर.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६० बाबुर कसेबसे प्राण वाचवून ते मार्गास लागले. दुःखाची आणि अपयशाची जालीम विषे पचविण्यांत बाबुराचे सामथ्र्य अचाट होते यांत शंकाच नाहीं. त्याच्या आनंदी वृत्ति पुन्हा खेळीमेळीचे व्यवहार करू लागल्या. कासीमबेग, कमरअल्ली वगैरे जिवलग स्नेह्यांनिश बाबुर आपला मार्ग आक्रमात होता. बाबुराचा घोडा सर्वांच्या पुढे होता व त्याचे इतर स्नेही मागे होते. तेव्हा ते आतां किती मागे आहेत हे पाहण्यासाठीं बाबुराने आपला घोडा थांबवून मागे वळून पाहिले. त्याच्या घोड्याच्या जिनाचा पोटतंग ढिला झाला होता, त्यामुळे तो खाली फेकला गेला. जमिनीवर मारलेला चेंडू अलगत उडी घेतो त्याप्रमाणे तो पडल्या क्षणींच उड्डाण घेऊन पुन्हा घोड्यावर स्वार झाला आणि मार्ग आक्रमू लागला, डोक्यास मुका मार बसला होता. त्याची धांग विलक्षण तव्हेने चढली होती. तो शुद्धीवर नव्हता. स्पप्नसृष्टीतील व्यवहाराप्रमाणे भोवतालचे व्यवहार चालू होते इतकेच. संध्याकाळी तो शुद्धीवर आला. दोन दिवसांच्या प्रवासानंतर त्याचा मुक्काम दिझाक या ठिकाणी झाला. येथे शत्रूच्या कक्षेतून ते पार पडले. गेल्या सहा-सात महिन्यांत त्या धास्तावलेल्या जीवांना सुखाचे अन्नपाणी का झोंप नव्हती. त्यांना यथाले पहिले जेवण, पहिला पाण्याचा घोट व पहिली निद्रा स्वर्गीय आनंदापेक्षाह अनुपमेय वाटली.