पान:बाबुर.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रबुद्ध भारत, सप्टेंबर १९४८ Not personal interest but the cause of the Nation First should be our motto, which has been emphasized by the author in lucid and vivacious style. Mr. V. G. Lele ( the author ) has done great service to the nation by bringing out this book at an opportune moment when nation building literature of this type is the need of the day. सकाळ, पुणे १९४८ . श्री. लेले यांचे पुस्तक इ. स. १९४८ मध्ये प्रसिद्ध झाले. एक प्रकारे सातारच्या गादीचे शतसांवत्सरिक श्राद्धच त्यांनी केले आहे. इ. स. १८४८ मध्ये शेवटला छत्रपति आप्पासाहेब निधन पावला व त्याचा दत्तक पुत्र अमान्य वरून कंपनी सरकारने सातारचे राज्य खालसा केले. विजयनगरच्या साम्राज्याचा शेवट सांगणाच्या हारिभाऊ आपट्यांची वज्राघात' कादंबरी वा चतांना जो अनुभव येतो तसाच अनुभव येथेही येतो. कादंबरीपेक्षांही विदारक सत्यकथा यांत सांगितल्या आहेत. स्वतःच्याच दुर्दैवाचा चित्रपट प्रेक्षक बनून पाहतांना जसा तो पावतही नाही आणि अर्धवट टाकून उठवतही नाहीं, तसाच प्रकार शिवशाहीचा अस्त हाती घेतल्यावर होतो. पुढे काय झाले हे जाणण्याच्या अधिया औत्सुक्याने वाचक पानामागून पाने वाचीतच सुटतो, लेखकाने स्वतःच लिहिले आहे, * प्रस्तुत पुस्तकाचा विषय म्हणजे दुःखद घटनांची मालिकाची मालिकाच, ती संकलित करतांना मनाला अत्यंत क्लेश झाले. वाचकालाही त्या वाचतांना अनेक यातना होतात व हृदयाला चटके बसतात, पण त्यांत व्यक्तिदोषापेक्षा आत्मनिरीक्षणाचा हेतु प्रधान आहे. वकीय वा परकीय कोणाच्याहि दुर्गुणांबद्दल घृणा व गुणांबद्दल गौरव करतांना मनाचा समतोलपणा त्यांनी राखला आहे.