पान:बाबुर.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समरकंदला राम राम १ १ १ १८ बाबुर जीव घेऊन समरकंदला आला. आतां शहराचे रक्षण कसे करावयाचे हा मोठा प्रश्न होता. बाबुराच्या लष्कराची धूळधाण उडाली होती. तेव्हां आतां शहर कसे लढवावे हा मोठाच पेंच होता. यद्यपि राजनिष्ठ सेवकांवर त्याची मदार होती, तरी पण शत्रूशी दोन हात करणे हे त्यांस माहीत नव्हते. त्यांचा पेशा लष्करी नव्हती; पण हाती असणा-या साधनसामुग्रीवरच लढत देणे भाग होते. समरकंदची तटबंदी अतिशय मजबूत होती. तिच्या आश्रयाने शत्रूचा समाचार घेणे शक्य होते. शैवानखानाची धाड समरकंदवर आली याबरोबर चकमकीस सुरुवात झाली. तटाच्या आश्रयाने नागरिक शत्रूचा समाचार घेऊ लागले. एकदां तर दर्जीच्या दरवाज्याशी ( समरकंदच्या तटाचें एक प्रवेशद्वार ) उझबेग लोकांनी चांगलीच दंगल माजविली. शिड्या लावून ते वर चढू लागले, त्याबरोबर नागरिकांनी तटावरून अग्नीचा वर्षाव करून यांस खाली पाडले. समरकंदचा लढा केवळ तटाच्या साहाय्याने बाबुराने सहा-सात महिने चालविला. समरकंदभोंवतीं खळ्या खणीत शैबानीखान खडा होता. रात्री तर या लढ्यास विशेषच उग्र स्वरूप येई. काळ्याकभिन्न अंधःकारांत शैबानीखानाच्या उझबेग लोकांना जास्तच चेव येई. ते कर्कश अरोळ्या ठोकीत, गवताचे जाळ करीत, आणि पडघमांचे आवाज इतक्या जोराने चालत की त्यापुढे आग्यावेताळाची भीषणता कमी वाटे.