पान:बाबुर.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिषाने केलेला घात। होता. हे काय चालू आहे आणि याचा शेवट कसा होणार व याला तोंड कोणत्या लष्करी डावाने द्यावें हेच त्यास उमजेना. बाबुराच्या मागच्या बाजूस एकदम धडाका उडाला. तिकडे लक्ष वेधले जाते न जाते तोच पुढच्या बाजूस खणखणीस सुरुवात झाली. आतां दोन्ही बगलांवर जोरात मारगीर सुरू झाली. सगळीकडे गोंधळ माजला. या गोंधळांत बाबुराकडील मोगल लोकांनी त्यांचा नेहमीचा सैतानी खेळ सुरू केला. हे मोगल लोक असे विश्वासघातकी आणि बदमाष होते की, त्यांचा जय झाला की ते. गांवेंचीं गांवे लुटून फस्त करीत आणि पराभव होतो असे वाटले कीं घोड्याखाली उड्या टाकून त्या दंगलीचा फायदा घेत आणि आपल्याच लोकांचे गळे कापीत लूटमार करीत. हा त्यांचा पुरातन सैतानी खेळ त्यांनी आताही चालू केला. बाबुराच्या सैन्याची बेसुमार नासाडी त्यांनी चालविली.. सभोंवार बाणांचा वर्षाव होऊन सैनिकांची डोकी शेंदाडाप्रमाणे ठेचली जात होती. मोंगल सैनिकांचे विश्वास-घातकी अत्याचार एकसारखे चालू असल्याकारणाने बाबुराची लढाई बिघडली. सैन्य फटाटलें, फौजेचा भणभणाट झाला. बाबुराचा पराभव होऊन तो नदीच्या कांठाशी आला तों त्याच्याजवळ दहा-पंधराच लोक शिल्लक राहिले. आतां त्यांना कोहिक नदीचे पात्र ओलांडून जावयाचे होते. क्षणाचाही विचार न करता त्यांनी धाडकन् । नदीत उड्या टाकल्या. घोडे, त्यांची ती घाटदार जिने व चिलखते या सर्व सरंजामासुद्धां नदीचा प्रवाह कापून पलीकडे जाणे मोठ्या जिकीरीचे काम होते. प्राणावर बेतली होती. तेव्हां जिवाचा आटापिटा करून त्यांनी नदीचे पैलतीर गाठले. तेथे येतांच घोड्याची जिने व चिलखते फेकून देऊन त्यांनी समरकंदकडे धांव ठोकली. शैबानीखानास ठार करण्याच्या हेतूनें शुभ मुहूर्तावर बाहेर पडलेला बाबुर पराजय खाऊन माघारी आला. ज्योतिषाच्या सांगण्यावर आपण उगाच भिस्त ठेविली असे त्यास वाटले, पण त्याचा कांहीच उपयोग नव्हता. आल्या प्रसंगांतून निभावून जाणे हेच काय ते. शिल्लक होते. ते त्याने ह्या प्रकारे केलें व अपयश पदरी घेतले.