पान:बाबुर.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबुर। आणि हा पंधरवडा उलटला की बाबुरास अनिष्ट ग्रह येत आहेत तेव्हां खानाशी गांठ घालावयाची असेल तर ती आतांच घातली पाहिजे असे: ठरले. तेव्हां बाबुराचा नाईलाज झाला. तारखान आणि दुधलत अमीरांच्या-: कडून या लढ्यासाठी फार मोठी मदत यावयाची होती; पण ती प्रत्यक्ष दाखल होण्याच्या आधी बाबुरास या ज्योतिषांच्या सांगण्याची भुरळ पडली आणि तो स्वारीवर निघाला, इ. स. १५०१ मेच्या प्रारंभी एके दिवशी बाबुराचे सैन्य समरकंदच्या बाहेर पडले. बाबुराची चतुरंग सेना सर्व आयुधांनी सुसज्ज होती. लढाईत आपण विजयी होऊ असा आत्मविश्वास प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होता. समरकंदपासून जरा अंतरावर सारइपूल या ठिकाणी त्याने आपला तळ टाकिला. खंदक करून बचावाची सिद्धता केली. जोपर्यंत बाबुराचे सैन्य या. खंदकाच्या आसपास बचावाचे धोरण ठेऊन आपल्या हालचाली करीत होते. तोपर्यंत त्याच्या वाटेस जाण्याची ताकद शैबानीखानाची नव्हती. पण. चढाई करण्याच्या हेतुने बाबुराचे सैन्य पुढे येतांच शैबानीखानही चालून आला. सैन्ये एकमेकांस भिडण्याचा क्षण समीप आला. दोन्ही सैन्ये समारासमोर उभी होती. बाबुराने आपल्या सैन्याची रचना अर्धवर्तुळाकृति केला होती. डावी-उजवी बगल व मध्य यांची मजबुती चांगली होती. शैबानाखान बाबुरावर चाल करण्यासाठी निघाला. त्याचे सैन्य लांबच लांब रागन आले. त्याने तुलुघमा युद्धपद्धतीचा अवलंब केला. उझबेग लोक याच पद्धतीने लढत. या वेळी बाबुर या युद्धकलेत पटाईत नव्हता. पुढे तो या कलेत । निष्णात झाला. हिंदुस्थानांत त्याने याच युद्धकलेचा उपयोग केला. | शैबानीखान झपाट्याने आला त्याच्या सैन्याने बाबुराच्या डाव्या बाजूने वळसा घालून त्यास पुरा वेढला, आणि एकदम कचाकचीस सुरुवात झाली. वळीव पावसांतील गारांच्या मान्याप्रमाणे मागून व पुढून बाणांचा मारा तडातड होऊ लागला. असल्या युद्ध-तंत्राला बाबुर अगदीच अपरिचित