पान:बाबुर.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिषाने केलेला घात १ १ १७ शैबानीखान व उझबेग यांच्याशी धडक मारण्याची तयारी बाबुराने केली; पण ती पुरती होऊन त्यायोगे आपण त्यांस खास भारी झालों अशी त्याची खात्री झाली नव्हती. उझबेग लोकांचे लढाईचे डाव, व्यूह व लष्कराच्या हालचाली करण्याची तन्हा नीट बारकाईने अभ्यासून त्यावर तोडी, प्रतितोडी वगैरेची तयारी व्हावयाची होती. अशा अर्धवट स्थितीत शैवानीखानाशी सामना देण्याचा प्रसंग त्याच्यावर आला आणि तो प्रसंगच ठरला. समरकंदहून निघून गेल्यानंतर शैवानीखान बुखान्यास राहात होता. त्याने तेथे उझबेग लोकांची जमवाजमव चालविली होती, आणि जंगी तयारीनिशी बाबुरवर चालून जाण्याचा त्याचा बेत होता. सध्या त्याचा मुक्काम दाबुश या ठिकाणी होता. प्रसंगी समरकंदवर चाल करून जाणे सहज साधेल इतपतच अंतर समरकंद आणि दे'बुश यामध्ये होते. इ. स. १५०१ चा मे महिना उगवला आणि बाबुराने शैवानिखानावर चालून जाण्याचे ठरविले. मे महिन्याचा पहिला पंधरवडा बाबुरास अनुकूल ग्रहमानाचा होता. या वेळी शैबानिखानाशी बाबुरानें गांठ घातली तर त्यांत त्याला यश खास येईल व शत्रूचा-शैवानीखानाचा नायनाट होईल, कारण त्याला त्या वेळी ग्रह प्रतिकूल आहेत अशी प्रख्यात ज्योतिषांची मते पडली.