पान:बाबुर.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबुर अवधे सतरा-आठरा वर्षांचे होते. तेव्हा त्याचे फार दिवसांचे ६६ ध्येय आणि * महत्त्वाकांक्षा ? ही वर्णने शोभत सुद्धा नाहीत. पण हे शब्दप्रयोग वापरण्यासारखी कामगिरी बाबुराने केली हे मात्र खरे. त्याने गादीवर यैतांच सरहद्दीवरील सर्व राजे लोकांशी आपले स्नेह-संबंध वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न चालविला, उझबेग लोकांचे वाढते सामथ्र्य लक्षात घेता त्यांचा कायमचा बंदोबस्त करणे इष्ट होते आणि त्या दृष्टीने हालचाली संघटितपणे व्हावयास पाहिजे होत्या. त्या दिशेने बाबुराचे प्रयत्न चालू होते. या कामासाठी सर्वांनी एकदिलाने एकत्र यावे म्हणून त्याने विनंति केली, पण त्याचा कोही एक उपयोग झाला नाही. काहींनी उत्तरेच धाडिली नाहीत; कांहीना तुसडेपणा दाखविला; कांहींनी शे-दोनशे लोक मदतीदाखल धाडण्याचे ठरविले. या कामासाठी तरी सर्व मिझ आणि खान एकत्र होतील असे बाबुरास वाटत होते; पण त्यांत त्याची निराशा झाली. तथापि उझबेग लोकांशी टक्कर देण्यासाठीं बाबुराने आपलें सामर्थ्य वाढविण्याचे काम चालू ठेविलें. वर्ष दीड वर्षाच्या अवधीत समरकंदच्या कक्षेतील बहुतेक सर्व प्रान्त व गांवें बाबुराच्या सतैखाली आली. त्याचे सैन्यही त्या मानाने दिवसांनुदिवस वाढू लागले ह्याचाच परिणाम म्हणजे इ. स. १५०१ च्या मेमध्ये आपण शत्राना खानाशी सामना करू शकू असे त्यास वाटू लागले.