पान:बाबुर.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुढील तयारी शैबानिखान व त्याचे उझबेग लोक यांचा पुरा मोड करून त्यांना समरकंदच्या सरहद्दीबाहेर पिटाळून काढल्यानंतर समरकंदच्या तटावर ठिकठिकाणी टेहळे ठेवून शहराचा बंदोबस्त करण्यांत आला. बाबुराचे बेग लोक त्याच्याभोंवतीं जमा झाले. ज्याच्या त्याच्या चेह-यावर समाधान दिसत होते. समरकंदचा ताबा अकस्मिकपणे घेण्याची युक्ति काढिल्याबद्दल बाबुराची वाहवा चालली होती. एका भव्य उद्यानांतील राजवाड्यांत आतांचा राजशाही दरबार भरला होता. शहरांतील अमीर, उमराव, व्यापारी, मौलाना आणि काजी वगैरे सर्व झाडून त्या ठिकाणी आले होते. असा उमदा राजा लाभल्याबद्दल त्यांस समाधान वाटत होते. आज दीडशे वर्षेपर्यंत तैमूरचे वंशज त्या सिंहासनावर अप्रतिहतपणे राज्य करीत होते. शैबानीखान हा मध्येच उपटला. त्याने सुलतान अल्लीचा खून करून ही प्रथा खंडित केली. पण हा खंड फार दिवस टिकला नाहीं. तैमूरचा राजदंड पुन्हा त्याच्याच वंशजाच्या हाती आला. तो वंशदीप पुन्हां प्रखर तेजाने तेवू लागला हे पाहून रयतेस व बाबुरास अंतर्यामी फार आनंद वाटला. बाबुराच्या बुद्धिमत्तेची उंची आणि राजकारणी दृष्टीचा पल्ला फारच स्पृहणीय वाटतो. दुस-यांदा समरकंदच्या गादीवर येणा-या बाबुराचे वय