पान:बाबुर.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुन्हा एकदा समरकंद शत्रूने डाव साधलेला पाहताच बाबुराची निराशा झाली. अशा फसगत झाल्याकारणाने ह्या नाजूक मनःस्थितीत हात हलवीत अदिजानला माघारी जाणे जास्तच लाजिरवाणे झाले. समरकंदमध्ये तर पाऊल ठेवण्याची सोय नव्हती, कारण तेथे कपाळमोक्षच व्हावयाचा, तेव्हा त्याने पुन्हा आपला मोर्चा आइलाक पर्वतांकडे वळविला. बाबुर कफल्लक होतांच अल्ली दोस्तने त्याची रजा घेतली. आतां बाबुराबरोबर त्याचे शे-दोनशे बेग लोक एवढेच काय ते शिल्लक राहिले. बाबुर निराश मात्र झाला नाहीं, आइलाक पर्वतामध्ये काही दिवस काढतांच त्याचे मन ताजेतवाने झाले. त्याच्या डोक्यातील समरकंदचे विचार पुन्हां जोरात चालू झाले, त्या पर्वतावरील थंड वान्याने त्याचे विचार थंड न होतां लाल इंगळाप्रमाणे रसरसू लागले. आतां समरकंद हाती येणे म्हणजे एक मूखचे रवप्न उरले होते असे मात्र नाही. समरकंद हातीं यावयाचेच असेल तर त्याचा ताबा शक्य तो लवकर घेणे भाग होते. बानीने समरकंदचा ताबा घेतला होता पण त्याने केलेले अत्याचार सहजासहजीं पचण्यासारखे नव्हते. त्याने राजाचा खून केला होता व एका लोकप्रिय काजीचे डोके मारले होते. तेव्हां त्याच्यासंबंधी लोकांच्या मनांत तिटकारा व तिरस्कार निर्माण झाला होता. द्वेषाच्या भावना ताज्यातवान्या आहेत तोंच हर प्रयत्नाने समरकंद