पान:बाबुर.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फसगत nomm इ. स. १५०० च्या जूनमध्ये बाबुर समरकंदकडे अचानकपणे निघाला. समरकंदचा निरोप आला त्या वेळेस बाबुरावर पाळत ठेवणारा अल्ली दोस्त अंदिजानला नव्हता. तेव्हां आपण कोठे जात आहोत याचा थांगपत्ता लागू न देतां त्याने गुप्तपणे समरकंदची वाट धरली. अल्ली दोस्तला ही वार्ता कळताच त्याने बाबुरास वाटेंत गांठले व त्यास तो सामील झाला. बाबुरास ही गोष्ट मनापासून आवडली नाही. अल्ली दोस्तही आपल्याच लुबरेपणानें खजील झाला. कारण त्याच्या अंतःकरणाचा रंग बाबुराने पुरा ओळखला होता. समरकंदची वाट चालत असतां पुढे उरातिपा या ठिकाणी कमरअल्ली त्यास मिळाला. हाही मोठा शूर होता. बाबुराचा शत्रु तंवल याने त्यास अक्षीहून हाकलून दिले होते. समरकंदच्या अलीकडे युरतखान या ठिकाणी बेग लोकांचे कांहीं पुढारी व तारखान उमराव त्यास भेटले. त्यांनी बाबुराचें हार्दिक अभिनंदन करून त्यास असे सांगितले की, खवाजयाहया ह्या नांवाच्या काजीचें समरकंदमध्ये फार मोठे वजन आहे आणि तो तुम्हांस अनुकूल आहे. तेव्हां त्याच्याशी तुमचा समेट झाला की समरकंद हाती आलेच असे समजा. ह्यांच्या ह्या वाटाघाटी चालल्या होत्या व आतां बाबुराचा मुक्काम समरकंदच्या अलीकडील किश या ठिकाणीं होता, तोच त्यास मोठा विस्मयकारक देखावा दृष्टीस पडला. समरकंदच्या नाजूक परिस्थितीचा फायदा वेळ न गमवतां ताबडतोब यावयास पाहिजे होता. तसा प्रयत्न बाबुराने केला, तरी पण त्याला थोडासा विलंबच झाला. इतक्यांत उझबेग लोकांचा पुढारी खान व बाबुराचा शत्रु गैबानी यांनी समरकंदमध्ये प्रवेश केला व या अकस्मिक बनावामुळे बाबुरास किश या ठिकाणी हळहळत बसावे लागले. समरकंद चा ताबा घेतांच शैबानीने आपले खरे स्वरूप प्रगट केले. त्याने सुलतान अल्लीचा खून करून तैमूरचा वंशदीप मालवून टाकिजा आणि बाबुराशी संगनमत करू पहाण रा खवाजयाहया ह्याचा पाठलाग केला व तो हाती लागतांच त्याचे डोके मारण्यांत आले.