पान:बाबुर.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| पुन्हा एकदां समरकंद मध्ये आपण प्रवेश केला तर शैवानखानाची रेवडी उडवू. त्याचा धुराळा ताबडतोब होईल, कारण आपल्या बाजूला भलेपणा आहे. लोक आपले नांव घेतात. आपल्याला दुवा देतात, कारण आपली तेथील शंभर दिवसांची कारकीद चिरस्मरणीय झाली आहे. तेव्हां लोकांस आपण आल्याची वात कळतच आपले स्वागत होईल. नागरिक आपल्याभोवती गोळा होतील आणि आपण शत्रूला यशस्वी त-हेने तोंड देऊ असे त्यास वाटले. बाबुराची ही विचारसरणी तर्कशुद्ध होती. त्याने आपल्या सहका-यांचा विचार घेतला आणि तो उद्योगास लागला. समरकंदमध्ये अचानकपणे प्रवेश मिळविणे हे ह्या स्वारीचे मुख्य सूत्र होते. सर्व तयारी कडेकोट होतांच बाबुर एक दिवस एकाएकी मध्यरात्रीस युरातखान या ठिकाणी दत्त म्हणून उभा राहिला. तो त्यास समरकंदचा पाहरा जागता आहे असे आढळून आले. त्याबरोबर तो आपल्या सैनिकांसह गुप्त झाला; पण दुस-या खेपेस मात्र बाबुरा मोका बरोबर साधला. इ. स. १५०० व्या डिबरमध्ये तो शेलक्या लोकांनिशी निघाला. यावेळी मात्र त्याला पाहिजे तशी वेळ जुळून आली. त्याच्याबरोबर एक सुप्रसिद्ध काजी अबदलम करीम होता. त्याने फार झपाट्याने चाल केली. त्यांच्यापैकी कांहीं तट चढून वर गेले आणि त्यांनी अलगदपणें फिरूज महाद्वार उघडले. ते सताड उघडतांच बावुराने आपल्या सैन्यासह त्या महाद्वारातून सफाईनें समरकंदमध्ये प्रवेश केला. शहरामध्यें गाढ शांतता पसरली होती. नागरिक झोपी गेले होते. फक्त कांहीं व्यापारी त्या गडबडीने थोडेबहुत जागे झाले. त्यांना ही बातमी कळताच मोठे समाधान वाटले. तेथील सर्व मान्याच्या जागा हाती येतांच तांबडे फुटतें न फुटते तोच बाबुराच्या बेग लोकांनी शैबानीच्या उझबेग लोकांची पाठाडे सड्कण्यास सुरुवात के. पहाटेची साखरझोप घेत असतां उझबेग लोकांवर हा प्राणघातक हल्ला आल्याकारणाने त्यांस अवधान राहिले नाही. ते समरकंदमध्ये सैरावैरा पळू लागले; पण त्यांना गोळ्या घालून ठार करण्याचा सपाटा बेग लोकांनी चालविला. अकस्मात् शहर बाबुराच्या ताब्यात गेल्याकारणाने बानीखानास पळून