पान:बाबुर.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

याच लेखकाच्या कांहीं पुस्तकांवरील अभिप्राय शिवशाहीचा अस्त : महाराष्ट्र, पुणे कादंबरीप्रमाणे अद्भुत व आकर्षक असे पुस्तक लिहीत असतांना श्री. लेले यांनी कल्पनाशक्तीपेक्षां साक्षेपीपणाने जमविलेल्या माहितवरच भिस्त ठेविली आहे. हा इतिहास आहे. रोमांचकारी काया । आहे, पण काल्पनिक वादंबरी नव्हे. श्री. लेले यांनी हा विषय त्रयस्थ वृत्तीने लिहिला नाही. त्यांत स्वतःचे अंतःकरण ओतले आहे. त्यामुळे या पुस्तकांतील अनेक परिच्छेद भावनाशीलतेने ओथंबलेले व माहितीने भरगच्च भरले असे अहेत. ० ० ० हा विषय इतक्या यशस्वी त-हेने हाताळणारे श्री. लेले हे कोणी इतिहासाचे प्राध्यापक किंवा हा विषय व्यवसाय म्हणून अभ्यासणारे नाहीत. स्वतः इंजिनिअर असून इतिहासाचा त्यांना छंद आहे. || श्रीं. लेले यांनी दीर्घ परिश्रमानें स्वीकृत कार्याशी तादात्म्य पावून पुस्तक लिहिले. व फलटणचे अधिपति श्रीमंत राजे मालोजीराव यांनी या ग्रंथाच्या प्रकाशनास साह्य केलें या बद्दल उभयतांना मराठी इतिहास वाचकांत धन्यवाद देऊन हे समीक्षण पुरे करत. प्रा. रा. वि. ओतूरकर, पुणे.