पान:बाबुर.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फसगत समरकंदला राज्यक्रान्ति होण्याचा प्रसंग समीप आला होता. सुलतान अल्लीने एक घोडचूक केली. ती त्याच्या चांगलीच अंगाशी आली. समरकंदमध्ये तरखान लोकांची खानदानी घराणी पुरातन कालापासून होती. पिढयानपिढ्या त्या घराण्यांतील लोक मोठमोठ्या हुद्यांवर असत. त्यांचे वजन राजदरबारीही चांगले असें. जनतेतसुद्धा त्यास मानमान्यता होती. ह्या लोकांचा आणि सुलतान अल्लीचा कांहीं कारणावरून खटका उडाला. त्याबरोबर कोणत्याही तव्हेचा मागचा पुढचा विचार न करतां सुलतान अल्लीने या लोकांना समरकंदहून निघून जाण्याचे फर्मान काढिले. त्याबरोबर सुलतान अल्लीलाच त्याच्या सिंहासनावरून खाली खेचण्याचा बेत तरखान लोकांनी चालविला. - समरकंद बाबुराच्या डोक्यांतून नाहीसे झाले नव्हते. तोच प्रकार या लोकांचाही होता. शंभर दिवसांचें रामराज्य करून जाणारा बालराजा बाबुर त्यांच्याही स्मृतिपटावर कायम होता. तेव्हां तैमूरच्या सिंहासनावर पुन्हा त्यास प्रस्थापित करावे असे त्यांच्या मनाने घेतले आणि त्यांनी बाबुराकडे संधान लावलें.