पान:बाबुर.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आंद्जानल रामराम १३ ज्या ठिकाणी आपण कुलमुख्यारीने राज्य केलें म्याच ठिकाणी सत्ताहीनः राज म्हणून दिवस कंठौं बाबुरास अयंत कठीण जाऊ लागलैं. नदीच्या एका तीरावर अंदिजान आणि दुस-या तीरावर अक्षी अशी ही दोन राज धानीची शहरे दोन राजांच्या ताब्यांत होतीं. बाबुर व जांगीर हे दोन बंधू बोक्याप्रमाणे गुरगुरत आपआपल्या राजधानींत नांदत होतेदोघांनाही प्राप्त परिस्थितीत समाधान नव्हते. असे हे अतृप्त आरमे मोठ्या जिकीरीने आपले दिवस ढकलत होते. बाखुरला अंदिजानमध्ये कोणत्याच प्रकारचे सौख्य नव्हते. त्याच्या मनाने त्याचा त्याग केव्हांच केला होता. समरकंदचे विचार त्याच्या मनांत पुन्हां पुन्हां येत होते. बाबुरला ह्या लाजिरवाण्या जिण्याचा कंटाळा आला होता. नदीच्या पलीकडे त्याचे शत्रु त्याच्या उरावर नाचत होते. ज्याच्या शब्दावर विश्वसून तो येथे आला तो अी दोस्तही त्याला फारसें महत्त्व देत नव्हता.. त्यामुळे बाबुरास आणखीच दुःख होत . तेव्हां या पेचकटांतून निसटण्याची संधि केव्हां येईल याचीच तो वाट पाहात होता. इतक्यांत समरकंदकडून बाबुरास आमंत्रण आलेत्याबरोबर त्याने अंदिजानला राम राम ठोकला.