पान:बाबुर.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ बाबुर ताब्यात आले होते. भोंवतालचे वातावरण अजून गढूळ होते. आपणास कितपत स्थैर्य लाभते याचाही त्यास अंदाज नव्हता. अशा स्थितीत हा हुकूम म्हणजे स्वत:च्या पायांखालील फांदीवर कु-हाडीचे घाव घालण्यांतला किंवा निखान्यावरील राख फुकण्यांतलाच प्रकार; पण ते बाबुरानें केला, तसे होतांच अंदिजानला बंडाचा डोंब उसळला, चार हजार मोगल लोकांनी बंड केले. पुन्हां धामधुमीस सुरुवात झालं. हे चार हजार लोक पुन्हां तंबलला जाऊन मिळाले. त्याबरोबर तंबल मोठ्या आवेशाने बाबुरावर चालून आला. बाबुराने त्याचा प्रतिकार चालविला. बाबुर आणि तंबल या दोघांच्या लढाया म्हणजे कधीही न संपणारें लळीत होऊन बसले. केव्हां याची सरशी दिसावी तर केव्हां त्याची सरशी दिसावी असे होऊ लागले. शेवटी या भांडणाचा निकाल त्वयार्धम् मयार्धम् पद्धतीने केल्याशिवाय लागणार नाही असे सिद्ध झाले. दोन्ही पक्ष मेटाकुटीस आल्यानंतर या भांडणाचा निकाल तहाने झाला. फर्घाना प्रान्ताचे राज्य विभागले गेले. अंदिजान बाबुराच्या ताब्यात देण्यांत आलें व अक्षी जहांगिरच्या-अहंमद तंबलच्या बाहुल्याच्या ताब्यांत राहिले. उमरशेखच्या राज्याची दोन शकलें त्याच्या दोन मुलांनी केली आणि येथे हैं भाऊबंदकीचे नाटक पुरे झाले. इ. स. १५०० त बाबुराची सत्ता कमी झाली, पण ती अजून कनिष्ठ पातळीस पोंचली नव्हती. ती त्या बिंदूला जाणार होती हे खास,