पान:बाबुर.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नामधारी राजा ४५ wwwwwwwwwww बाबुर फर्घाना प्रांताचा राजा झाला. याचा अर्थ बंडवाले नेस्तनाबूद झाले, सगळीकडे शांततेचे वातावरण नांदू लागले, रामराज्य सुरू झालें असा मात्र नव्हे. अजून क्रांतीचे वारे वाहात होते आणि राजकारणाची चाकें मोठ्या कसोशीनें व डोळ्यांत तेल घालून फिरवणारा कर्णधार पाहिजे होता. बाबुरांत ती कुवत नव्हती असे मात्र नव्हते. तो समर्थ होता, पण त्याचे दयाशील मन त्याचा घात वारंवार करीत होते. त्याला साह्य करणारांमध्ये अहंमद तंबलच्या मोगल लोकांचा भरणा विशेष होता. ते चार हजार होते. हे लोक म्हणजे बाबुराच्या पायांतील सलता कांटा. त्याला धक्का लागला कीं जीव कासावीस होण्याचा प्रसंग. बाबुरास मदत करणारे हे मोगल म्हणजे माजलेले पेंढार, फर्घाना प्रांतावर कोणाचेही राज्य असो; बाबुरचे राज्य असो अथवा जहांगीरचे असो किंवा कोणाचेहि नसो, त्याची पवई यांना नव्हती. त्यांचा स्वहिताचा धंदा स्वछंदपणे मोकाट चालू असे. खच्चून लूट मिळविण्यासाठी रक्तपात, खून, दरोडे, जाळपोळ, वाटेल ते अत्याचार ते बेधडक करीत. त्यांनी आपला हा खाक्या बाबुर पुन्हा गादीवर आला तरी तसाच चालू ठेवला. बाबुरास तर या गोष्टीची प्रथमपासून चीड होती. आपण राज्य करीत असतां रयतेत आबादानी नांदावी, तिला कोणत्याही त-हेचा उपसर्ग पोंचू नये असे त्यास वाटे; पण बाबुराचे, हे विचार म्हणजे बचनागाच्या वनांत तुलसीच्या रोपट्याप्रमाणे होते. त्याच्या या दयाशील अंतःकरणाची रयतेस जाणीव होती. रयतेकडून मोगल लोकांच्या अत्याचाराबद्दल एकसारख्या तक्रारी येऊ लागल्या त्याबरोबर बाबुराचे मन द्रवले. त्यानें कडक उपायांचा अवलंब केला. खरे दयाशील मन तेंच की जे योग्य ठिकाणी निर्दय व त्यागी बनू शकते. विनाकारण लूट करणारास कडक शासन करण्यात येईल असा हुकूम त्याने काढला आणि त्याची अंमलबजावणी कोणाचीहि पर्वा न करतां न्यायनिष्ठुरपणे चालू केली. त्याबरोबर रयतेने त्यास दुवा दिला; पण त्याचा पारणाम लष्करी दृष्ट्या फारच प्रतिकूल झाला. बाबुराचे हे करणे योग्य होते, पण त्याला ही वेळ अनुकूल नव्हती. राज्य नुकतेच