पान:बाबुर.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नामधारी राजा अल्ली दोस्तने बाबुरास धाडलेले आमंत्रण म्हणजे कांहीं तरी अपेक्षेबाहेरचे कृत्य झाले असे मात्र नव्हते. गेल्या दोन वर्षांत फघांना प्रान्तांत झोटिंगशाही चालू होती. जहांगीर आणि अहंमद तंबल या उभयतांनी सैतानी सोटा फिरवून फर्घाना प्रान्ताच्या रयतेस त्राहि भगवन् करून सोडले होते. तेव्हां आपली जुना राजा शतपटीने चांगला, तो पुन्हा आपणांस लाभला तर फार चांगले होईल असे रयतेस एकसारखे वाटत होते. या इच्छेचे रूपांतर कृतींत. होऊ लागले होते, आणि त्याचे प्रतीक म्हणजेच हें आमंत्रण होते. । मार्धिनान शहरी बाबुर दाखल होतांच ही आनंदाची बातमी सगळीकडे फैलावली. अनेक सैनिक बाबुरास येऊन मिळाले. दिवसानुदिवस बाबुराचें पारडे जड होऊ लागले. ते शहर आपण होऊन त्याच्या ताब्यांत गेले. बाबुराने अक्षीशहराचा ताबा घेतल्याचे वृत्त जहांगीर व त्याचा साथीदार अहंमद तंबल यास कळताच त्यांनी त्यास तेथून उखाड देण्यासाठी सैन्य रवाना केले; पण अक्षीचे वातावरण बाबुरास इतके अनुकूल होते की, शत्रुसैन्य घेतांच त्या ठिकाणी त्याची रेवडी उडाली, इ. स. १४९९ च्या जून मध्ये अंदिजान बाबुराच्या ताब्यात आले. अशा त-हेने फघांना प्रान्ताचे राज्य पुन्हा एकदा त्याच्या कायदेशीर वारसाकडे गेले, आणि लोकांत समाधान नांदू लागले.