पान:बाबुर.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आमंत्रण माफी करावी आणि नि:संकोच मनाने येथे यावे. माधिनान शहर आपलेंच आहे, ते आपण आपल्या ताब्यात घ्यावे, मी आपल्यास सर्वतोपरी सहाय्य करण्यास तयार आहे. या पुढील माझी वर्तणूक आपला एक नम्र व विश्वासू नोकर अशीच राहील. | अल्ली दोस्तचे हे लिखाण वाचतांच बाबुरास मोठा आनंद वाटला. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्यांत बाबुराचे बालमन मोठे तरबेज होते. सूर्यास्त झाला होता तरी तो ताडकन् मार्धिनानकडे निघाला. क्षणाचाही विसांवा न घेता त्याने ती रात्र संपून सूर्य डोक्यावर येईपर्यंत प्रवास केला. नंतर चार घटका विश्रान्ति घेऊन पुन्हां एक दिवसपर्यंत प्रवास केला, आणि नंतर सूर्योदयाच्या सुमारास तो मार्धिनानपासून चार मैलांवर आला. माधिनानच्या सन्निध येतांच त्याचे मन बावरलें. आपण अली दोस्तावर विश्वास ठेवून आलों; पण त्याच्या मनांत कांहीं काळेबेरें तर नसेल ? तो कांहीं डाव तर साधणार नाहीं ? आपण करतो हा मासलेवाईक मूर्खपणा तर होणार नाहीं ना ? असले विचार मनात येतांच बाबुराच्या मनाचा भयंकर गोंधळ झाला. पण आतां ह्या विचारांचा कांहींच उपयोग नव्हता. इतक्या नजक आल्यानंतर माघारी फिरणे हाच उलट मासलेवाईक मूर्खपणा झाला असता. आधी तीन दिवस अहोरात्र व विश्रान्ति न घेता घोड्याच्या पाठीवर शे-दोनशे मैलांचा टापू त्याने आक्रमिला होता, अंगांत त्राण उरला नव्हता, आणि आतां माघारीं फिरणे अशक्य होते. तेव्हां जिवाचा धडा करून त्याने मार्धिनानमध्ये प्रवेश केला. तेथे त्याचे स्वागत उत्तम प्रकारे झाले. बाबुर आपल्या दोनशे चाळीस सैनिकांसह पुन्हा एकदां सुरक्षित ठिकाणी दाखल झाला.