पान:बाबुर.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आमंत्रण त्या निराशेच्या दिवशी दुपारी बाबुर आपल्या निवासस्थानी सचिंत बसला असतां स्वारांच्या टापांचे आवाज मैदानांत घुमू लागले. प्रथम बाबुर जरा गांगरला. शत्रु का मित्र याचा निर्णय होईना; टापा अनेक घोड्यांच्या का एका घोड्याच्या हेही कळेना; पण थोड्या वेळांतच निर्णय लागला. तो एकच स्वार होता; आणि त्याने एक लिफाफा आणिला होता. लिफाफा दोस्त अल्लीचा होता. त्याने बाबुरास काकुळतीची विनंति केली होती की, फर्घाना प्रान्ताचे राज्य शत्रूच्या हवाली करण्यांत माझ्या हातून फारच मोठी चूक झाली. समरकंदहून निरोप आणणाच्या एका जासुदाने गोंधळ केला हेही खरे; पण त्याहिपेक्षा अंदिजान शत्रूच्या हवाली करून मी माझा स्वार्थ साधला. अदिजानचा ताबा देतांच शत्रूनें माझें कोटकल्याण केलें. फर्घानामधील दुसरे महत्त्वाचे शहर माधिनान हें कुल-मुखत्यारीने माझ्या ताब्यांत मिळाले. किंचित्काल स्वार्थाच्या मोहास बळी पडून मी हा सौदा केला, पण त्या क्षणापासून माझे चित्तस्वास्थ्य नाहीसे झाले. मी निमकहरामीनें हैं वैभव मिळविलें, माझा धनी प्रसंगांत सांपडला असता त्यास साफ दिलाने मदत न करता त्याच्याशी बेइमानी केली. मला आतां पश्चात्ताप झाला आहे. गेली दोन वर्षे माझी अवस्था भुताने पछाडल्याप्रमाणे झाली आहे. तरी आपण मला एकवार