पान:बाबुर.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रंकाचे जिणे दाखविला असता तर फार चांगले झाले असते; पण तसे झाले नाही. सुलतान अल्लीचा तसा हुकूम येतांच बावुराने आपला बेत बदलला आणि त्याने आपला हा काल आइलक पवताच्या रांगेतून कंठण्याचे ठरविले. कारण या ठिकाण त्यास कोणाही सत्ताधा-यांचा उपद्रव पचण्यासारखा नव्हता. समरकंद, अंदिजान व हिरात या सर्व ठिकाणी त्याचे चुलतभाऊ व चुलते राजराजेश्वर म्हणून राज्य करीत होते. बाबुर अक्षरशः वनवासी झाला होता.. सर्व संबंधापेक्षां रक्तसंबंध श्रेष्ठ असे आपण मानतों व ते खरेही आहे; पण कांहीं वेळेला हे रक्तसंबंधच घातक ठरतात. बाबुराचे सगेसोयरेच त्याच्या जिवावर उठले होते. तेव्हां त्याने निसगसारखा प्रेमळ सखा जोडला आणि त्याच्या आनंददायी सहवासांत आपली कालक्रमणा चालू केली. बाबुर तसा रसिक होता. त्याच्याजवळ प्रतिभाशाली कवीची सौंदर्यदृष्टि होती. तो वनश्रीशी समरस होऊन आपल्या आयुष्याचे दिवस मोठ्या समाधानांत कंठीत होता. पण हे समाधान खरे नव्हते. पोटांत वडवानलाच्या ज्वाला एकसारख्या भडकत असतां सागराने पौर्णिमेच्या दिवशी पर्वतप्राय लाटांच्या ओठांनी खदखदा हंसावे तशांतला हा प्रकार होता. निसर्ग पहातांच बाबुराची काववृत्त आनंदाने डोलू लागे. त्या डोलण्यांतून दुःखाचे फूत्कार बाहेर पडत.. गिरिगव्हरांत त्याने जवळ जवळ दोन वर्षे काढिली. एकाएक एक दिवस बाबुराचे चित्त अस्वस्थ झाले. तो कष्टी झाला. काय करावे, कोठे जावे, हे कष्टतर आयुष्य केव्हां संपणार, आपली स्थिति पालटणार की है दिवाभीताचे आयुष्य कंठीत असतांच मृत्यु येणार वगैरे वगैरे वेडे-विद्रे विचार त्याच्या मनांत येत होते. पण बाबुराचे आयुष्य म्हणजे एक रहस्यमय कादंबरी. त्याच दिवशी त्यास आमंत्रण आले.