पान:बाबुर.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रंकाचे जिणे तो खंक झाला होता. निराशेचा अंधकार त्याच्या दृष्टिसमोर पसरला होता. आशेचा लुकलुकता किरण कोठेही दिसत नव्हता. त्या वेळी त्याच्या ताब्यांत खोजंद होते. येथेच सुदैवाने शत्रूच्या तावडीतून शिरसलामत निसटलेली त्याची आई आणि आजी त्यास येऊन मिळाली. हे कठीण दिवस कोठे आणि कसे काढावेत हा मोठा प्रश्न होता. खोजंदसारख्या छोट्या गांवीं आपल्या दोनतीनशे लोकांच्या परिवारासह दिवस काढणे फार मुष्किलीचे होते, तेव्हां खोजंद व समरकंद या दोन शहरांच्या दरम्यान एकाद्या पर्वताच्या आश्रयाने दिवस कंठण्याचा त्याचा विचार झाला आणि तो तेथे राहण्यास गेला, पण समरकंद व खोजंद यादरम्यानच्या पर्वतरांगांवर सुलतान अल्लीची सत्ता होती. त्याने बाबुरास आपली हद्द सोडून जाण्यास हुकूम फर्माविला. त्याबरोबर बाबुराचे सर्व विचार हवेतील मनोच्याप्रमाणे कोसळले. या वेळीं सुलतान अल्लीने जरा दयाई बुद्धि दाखविली असती तर चालले असते. कारण समरकंदचे राज्य बंदुकीचा एक बारही न काढता त्याच्या पदरात पडले होते. ते जिंकण्याकरिता त्याला कोणताही त्रास झाला नव्हता. बाबुर आजारी पडला नसता तर त्यास समरकंदचे राज्य मिळणे अशक्य होते. तेव्हां सुलतान अल्लीने बाबुरास आपल्या हद्दीत राहू देण्याचा मोठेपणा