पान:बाबुर.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अर्धे राज्य mmmmm महत्त्वाकांक्षेस फंकर घालण्याचा प्रयत्न बाबुराने केला. पण महंमदखान म्हणजे दिल्या प्रकृतीचा मनुष्य; त्याला पीळ कोठेच नव्हता. त्याच्या अंगीं शिपायाचे तेज नव्हते की सेनानायकाचा वकूच नव्हता. पण कोणीं कांहीं सुचविल्यास ते करण्याची सुबुद्ध मात्र होती. म्हणून बाबुराने इच्छा प्रगट करतांच त्याने फघना प्रान्तावर चाल केली; पण तो अक्षा या गांव येतांच फर्वाना सर करून बसलेल्या राजकुमार जहांगीरच्या लोकांनी महंमदखानाची समजी केला. त्यासरसे त्याचे सैन्य माघारी फिरले. हा देखावा पहातांच बाबुर जागच्याजागी सर्द झाला. त्याची पुनरपि दारुण निराशा झाली. त्याच्या सैनिकांचा तर धीरच खचला. त्याला मुख्य कारण असे होते की, सर्व लष्कर अंदिजानचे रहिवासी होते. त्यांचे जिव्हाळ्याचे लागेबांधे त्या शहरांत गुंतले होते. बायका-माणसे तेथे होती. फघना प्रान्त काबीज करणे आणि अंदिजानचा ताबा घेतल्यानंतर विजयी वीर म्हणून आपल्या मुलांमाणसांत जाऊन बसणे आणि तो स्पृहणीय आनंद उपभोगणे या गोष्टी त्यांस अशक्यप्राय वाटू लागल्या. त्याबरोबर त्याचे लष्कर निराशेने हैराण झाले व हजारांपैकी जवळ जवळ आठशे लोकांनी बाबुरास राम राम ठोकला. बाबुराचे पारडे हलके झाले. तो भाग्यवानाचा भाग्यहीन झाला. राजाचा अंक झाला.