पान:बाबुर.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबुर मारणे ? एवढेच राहिले होते. अशा स्थितीत * खानेको मै और लढनेको मेरा भाई' या म्हणीप्रमाणे बाबुराचा चुलतभाऊ सुलतान अल्ली त्या ठिकाणी दाखल झाला. तो येतांच अर्थातच फटाफुटीस सुरुवात झाली. कांहींनी सुलतान अल्लीचा पक्ष धरला व कांहींनी बाबुराचा पक्ष स्वीकारला. समरकंदच्या लढ्यांत आपणांस अमाप लूट मिळेल या कल्पनेने आलेले सैनिक, बाबुरानें लूटमार करू न दिल्याने नाखूष झाले होते. नंदनवनाशी बरोबरी करणारे समरकंद या क्रांतीच्या डोकेफोडीने उजाड होऊ लागले होते. तेव्हां हैराण झालेल्या रयतेवर पुन्हा जादा कर बसवून त्याची वसुली जबरीने करावी हैंही बाबुरास मानवेना. तेथील शेतक-यांस बी-बियाणे देऊन त्याने त्यांची तरतूद केली; पण नवी पिके हाती येईपर्यंत कांहींहि करता येणे शक्य नव्हते. तेथील कोरडी मजा बाबुराच्या सैन्यास चांगलीच जाणवू लागली. जो तो तेथून निघून जाण्याचा विचार करू लागला, एकेक सैनिक तेथून नाहीसा होऊ लागला. आतां भराभर लष्कर कमी होऊ लागले. शेवटी एके दिवशीं अहंमद तंबल नांवाचा त्याचा मुख्य लष्करी अधिकारी त्याला सलाम ठोकून असार झाला. बाबुराचे दुर्दैव पुरे ओढवले. आता त्याच्याजवळ फक्त एक हजार लोक शिल्लक राहिले. इतक्यांत तो एकाएकी आजारी पडला. दुखणे विकोपास गेले. त्याची शुद्ध बुद्ध हरपली. चार दिवस त्याची वाचा बंद होती. औषधाचा किंवा अन्नाचा एक कणही घोटेना. कोरडी जीभ ओली करणे आणि नाडी ठिकाणावर आहे की नाही ते पहाणे हे एकच काम शिल्लक राहिले, अशी त्याची दैना झाली. बाबुराच्या गळ्याभोंवतीं मृत्यूचा पाश करकचून आंवळला जात होता, तर इकडे अंदिजानमध्ये बाबुरास त्याच्या वडिलार्जित तख्तावरून फेकून देण्याचे काम जोरात चालू झाले होते. * तुम्हीं ताबडतोब आला नाहीत तर राज्य जाते; आमचा जीव धोक्यांत आहे' अशी पत्रे व निरोप घेऊन स्वार