पान:बाबुर.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शंभर दिवसांचे राज्य दौडत येत; पण त्याचा कांहींहि उपयोग होत नव्हता. कारण बाबुर शरपंजरी पडला होता. इतक्यांत अझन हस्सन नांवाच्या एका निरोप्याने गोंधळ केला. त्याने बाबुरास घरडा लागला असून मी येथे येईपर्यंत तो तिकडे आटोपलाही असेल असेच सांगितले. त्याचा परिणाम मात्र फार विचित्र झाला. शत्रूला तोंड देऊन बाबुराच्या आईचे आणि आजीचे संरक्षण करणार अंदिजानचा सुभेदार अल्ली दोस्त या निरोपाने एकदम गोंधळला. त्याचे धैर्य वचलें व त्याने किल्ला शत्रूच्या हवाली केला. संधीचे करार-मदारही झाले. फर्दाना प्रान्ताचे राज्य बाबुराच्या हातचे गेले. गोष्टी इतक्या थराला गेल्या पण सुदैव इतकेच की, पुढे लौकरच बाबुराच्या प्रकृतीस आराम वाटू लागला. तो हिंडता फिरता झाल्यावर त्यास त्याच्या फांना प्रान्ताची हकीगत सांगण्यांत आली, तेव्हां तो टाकाटाक अंदिजानकडे निघाला. मजल-दरमजल करीत त्याने खोजंद गांठले. या ठिकाणी तो पोंचला तोंच त्यास अंदिजानची हकीगत कळली. आतां तेथे जाण्यांत अर्थ नव्हता. जे काय व्हावयाचे ते सर्व होऊन चुकले. या घटनेने बाबुरास भयंकर धक्का बसला. फघना प्रान्ताचे राज्य गेलें आणि याच्याहीपेक्षा दुसरा चमत्कार असा झाला की,बाबुरने समरकंद सोडतांच त्याचा ताबा त्याच्या चुलतभावाने-सुलतान अल्लीने घेतला. इकडे सख्ख्या भावाने जुने वडिलार्जित राज्य घेतले तर तिकडे चुलतभावाने नवे मिळवलेले राज्य बळकाविले. अशा त-हेने बाबुराचे राज्य दोन्ही ठिकाणांहून एखाद्या पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे तीन ताड उडाले. त्याची स्थिति चमत्कारिक झाला. हेही गेले व तेही गेले आणि हात चोळीत बसण्याचा प्रसंग त्याच्यावर आला.