पान:बाबुर.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शंभर दिवसांचे राज्य बाबुराचे समरकंदमधील हे शंभर दिवस अत्यंत आनंदांत गेले. त्याच्या गोड स्मृति त्याच्या हृत्पटलावर कायमच्या कोरल्या गेल्या. त्याचे दिवस आनंदांत चालले होते. सकाळचा काळ सुखांत जावा, क्षणाक्षणाला आनंद द्विगुणित व्हावा; पण त्या कालांतच अखिल भू-भागाला संत्रस्त करून सोडणारे दुपारच्या मायान्हीचे वातावरण तयार होत असावे. प्रातःकाली दशदिशांना संजीवित करणारा सूर्य नारायण दुपारी बाराला इतकें उग्र स्वरूप धारण करतो की, त्यामुळे सर्वांगाचा भडका होतो आणि त्यांतून कसे मुक्त व्हावें हेच उमजत नाहीं. समरकंदला बाबुराने शंभर दिवस काढिले, आणि शंभराव्या दिवशी त्याच्या विलोभनीय सौख्यास कोणा पाप्याची दृष्ट लागली, त्याबरोबर ते भंगले. शंभराव्या दिवशी त्या सौख्याची सद्दी संपली. (सद्दी=शंभर ) त्याला ओहटी लागली. रोज नव्या नव्या भानगडी निर्माण होऊ लागल्या. बाबुराने सहा महिने कोणत्याहि गोष्टीची तमा न करतां समरकंदचा लढा जिंकला आणि शत्रूचा निःपात केला. आतां तो त्या ठिकाणी आनंदांत आपली कालक्रमणा करीत होता. तंटा-बखेडा निर्माण होण्याचा संभव यत्किंचितही नव्हता. सर्व वातावरण निरामय होते. आता फक्त “ मजा